एका माकडानं काढलंय दुकान, विश्वास बसत नाही तर एकदा हा व्हिडीओ पाहाच

'एका माकडानं काढलंय दुकान', आता फक्त गाण्यात नाही तर खऱ्या आयुष्यातही जाता येणार माकडाच्या दुकानात, कसं? पाहा व्हिडीओ

Updated: Jan 21, 2022, 07:57 PM IST
एका माकडानं काढलंय दुकान, विश्वास बसत नाही तर एकदा हा व्हिडीओ पाहाच title=

नवी दिल्ली : एका माकडाने काढलं दुकान आली गिऱ्हाईके छान छान हे गाणं सगळ्यांनी ऐकलं असेल. आतापर्यंत फक्त हे गाण्यात ऐकलं होतं पण असं कुठे प्रत्यक्षात पाहता आलं तर? खरंच एक माकड दुकानात बसून भाजी विकत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

हे माकड पाहिल्यानंतर सर्वात पहिल्यांदा एका माकडानं काढलं दुकान हेच गाणं मनात येतं. हे माकड प्रत्यक्ष भाजीच्या दुकानात बसलं आहे. विशेष म्हणजे हे माकड कोणतीही नासधूस करत नाही. शांतपणे भाजीकडे कोण येत आहे का गिऱ्हाईक ते पाहात बसलं आहे. 

या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे माकड नेमकं इथे कसं आलं? याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. मात्र माकडानं दुकान उघडल्याची सोशल मीडियावर मात्र चर्चा चांगलीच रंगली आहे. अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. 

एक युझर म्हणतो एकीकडे शेतकरी आणि त्याची मुलं शेती सोडत आहेत त्यामुळे माकड याकडे वळलं असावं. तर दुसरा युझर म्हणतो की कहीं ऑनलाइन शापिंग, कहीं पूर्वज सेलिंग. अशा अनेक मजेशीर कमेंट्स लोकांनी यावर केल्या आहेत. 

 @ipskabra नावाच्या एका युझरने ट्वीटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. लोक या माकडाच्या चाळ्यांना पाहून खूप हसत देखील आहे. अनेकांनी हा शेअर देखील केला आहे. सोशल मीडियावर सध्या या व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झी 24 तास ह्या व्हिडीओची कोणतीही पुष्टी करत नाही.