मिठाई पाहताच कुत्र्याच्याही तोंडाला सुटलं पाणी, ताव मारण्यासाठी काय केलं पाहा

मिठाईचा मोह कुत्र्यालाही नाही आवरला, तोंडाला सुटलं पाणी मग काय...घुसला की राव दुकानात

Updated: Mar 27, 2021, 06:19 PM IST
मिठाई पाहताच कुत्र्याच्याही तोंडाला सुटलं पाणी, ताव मारण्यासाठी काय केलं पाहा  title=

मुंबई : मिठाई म्हटलं की कुणाचाही तोंडाला पाणी सुटतं. मिठाईच्या दुकानात कायमच गर्दी असते. कधी सण तर कधी सुट्टी मिठाई खाण्याचं निमित्त सर्वांनाच हवं असतं. अनेकदा मिठाईला माशा आणि मुंग्याही आल्याचं पाहिलं आहे. दुकानात मिठाई अगदी मस्त सजवलेली दिसली की घेण्याचा मोह कुणाला आवरत नाही?

मिठाईचं दुकानं अगदी खच्च भरलेलं आणि डिस्प्लेवर लावलेली मिठाई पाहून एका कुत्र्याला हाच मोह अनावर झाला. या कुत्र्याच्या तोंडाला पाणी सुटलं आणि काय विचारता. कुत्र्यानं थेट मिठाईच्या दुकानात घुसखोरी केली. इतकच नाही तर बिनधास्त कुत्रा मिठाई ठेवलेल्या काऊंटर खालच्या बॉक्समध्ये घुसला आणि त्यानं ताव मारायला सुरुवात केली. 

काऊंटर खालच्या मिठाई ठेवलेल्या डिस्प्लेच्या कपाटात कुत्रा घुसला हे कळताच मालक आणि कामगार यांच्यात गोंधळ उडाला. तिथे काम करणाऱ्या एका व्यक्तीनं या कुत्र्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. कुत्रा बावचळला आणि पळापळ करू लागला आणि कसा बसा त्यातून बाहेर पडला.

संतापलेल्या मालकानं त्याला बाहेर काढलं खर पण ही घटना मात्र सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरली. आतापर्यंत हा व्हिडिओ 10 हजार वेळा पाहिले गेला आहे. एका यूजरने या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत म्हटले आहे, 'घोर कलियुग'. लोक या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.