Viral Video Indian: संकट कधी कसं कुठून येईल याचा काही नेम नाही. मात्र, काही संकट अशी असतात की ज्यांची तीव्रता दिसायला खूप जास्त वाटते. प्रत्यक्षात मात्र, संबधीत व्यक्ती यातून अगदी सुखरुप बाहेर पडतो. असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका महिलेच्या अंगावर पाण्याची टाकी पडते. मात्र, या महिलेला काहीच होत नाही. महिला पाण्याच्या टाकीतून अगदी सुखरुप बाहेर पडते.
Pooja_1010 असे युजर नेम असलेल्या @Dabbu_1010 या X सोशल मिडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. फक्त 22 सेकंदाचा हा व्हिडिओ जितका गमतीशीर आहे तितकाच थरारक देखील आहे. सफरचंद खात चालत असलेल्या एका महिलेच्या अंगावर मोठी पाण्याची टाकी पडल्याचे या व्हिडओत दिसत आहे. हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. नेटकऱ्यांनी नुसता व्हिडओच पाहिला नाही तर यावर गमतीशीर कमेंट देखील केल्या आहेत.
Kuch bhi ho khana rukna nahi chahiye..! pic.twitter.com/4220xFA0sJ
— Pooja_1010 (@Dabbu_1010) October 13, 2024
हा व्हिडिओ नेमका कुठला आहे? लोकेशन काय आहे ते समजू शकलेले नाही. या व्हिडिओमध्ये एक महिला शांतपणे सफरचंद खात रस्त्याने चालली आहे. या महिलेला कल्पना देखील नाही अवघ्या काही क्षणात तिच्यासह एक अतिशय धक्कादायक प्रसंग घडणार आहे. माहिला काही पावलं चालल्यावर तिच्यावर मोठी पाण्याची टाकी धापकन अंगावर पडते. ही महिला पाण्याच्या टाकीखाली जाते. टाकी पडल्यामुळे जोरात आवाज येतो. हे पाहून एक पुरुष या महिलेच्या मदतीसाठी धावून येतो. या महिलेला नेमकं काय झालं हेच कळत नाही. महिला खूपच गोंधळलेली दिसते. महिला टाकीतून डोकं बाहेर काढते. महिला आणि तिला मदत करण्यासाठी आलेला पुरुष टाकी कुठे पडली हे शोधताना दिसत आहे. यानंतर महिला पुन्हा नॉर्मल होईऊन सफरचंद खाताना दिसत आहे. दिसताना हा व्हिडिओ अतिशय गमतीशीर वाटत असला तरी ही टाकी अंगावर पडल्याने महिलेला गंभीर दुखापत देखील होऊ शकली असती. मात्र, ही महिला अपघातून सुखरुप बचावली आहे. या व्हिडिओवर अतिशय गमतीशीर कमेंट आल्या आहेत.