Viral Video : सापाला गिळलं कि नूडल्स खाल्लं...बगळेबुवा तुम्ही कमालच केली !

Viral Video : मोठे प्राणी लहान प्राण्यांची शिकार करतात तर लहान प्राणी त्यांच्याहीपेक्षा लहान प्राण्यांना आपले भक्षण बनवतात कधीकधी असे व्हिडीओ पाहून आपल्याला वाईट वाटत पण शेवटी हा निसर्गाचाच समतोल राखण्याचा नियम आहे. 

Updated: Jan 6, 2023, 10:22 AM IST
Viral Video : सापाला गिळलं कि नूडल्स खाल्लं...बगळेबुवा तुम्ही कमालच केली ! title=

Viral Video : सोशल मीडियावर (social media) नेहमीच बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक फोटोसुद्धा व्हायरल होत असतात. बरेच फोटो आणि व्हिडीओ लोकं फार आवडतात आणि रातोरात ते वाऱ्यासारखे पसरतात आणि फेमस होतात, काही व्हिडीओ पाहून हसू आवरत नाही इतके ते मजेशीर असतात तर काही व्हिडीओ पाहून भावुक व्हायला होत इतके ते संवेदनशील असतात. आता नुकताच असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ बऱ्याच जणांनी पहिला आहे. 

सध्या सोशल मीडियावर (social media)  एक व्हिडीओ खूप व्हायरल (viral video) होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक बगळा दिसतोय त्याला प्रचंड भूक लागली आहे, पण यावेळी त्याने अशी काही शिकार केलीये कि त्याची तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही. एरव्ही साप म्हटलं तरी भल्याभल्यांचा घाम फुटतो. सापाचा एक दंश (snake bite) आणि माणूस जीवानीशीच जातो, त्यामुळे लोकं सापापासून दोन हात लांब राहणंच पसंत करतात.   

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये बगळ्याने चोचीत एका सापाला घट्ट पकडलं आहे ,साप त्याच्या तावडीतून वाचण्यासाठी प्रयत्न करताना दिसतोय. तलावातून साप शोधून त्याने शिकार केली आहे. पण बगळ्याच्या तावडीतून त्याच सुटणं केवळ अशक्य दिसत आहे. यानंतर चोचीत सापाला पकडून बगळा तिथून जाताना दिसत आहे. (heron caught the snake viral video)  

व्हायरल होत असलेला व्हिडीओ सध्या नेटकर्यांना खूप पसंतीस पडतोय. सोशल मीडियावर या व्हिडिओला प्रचंड प्रमाणात लाईक्स मिळत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ शेअरसुद्धा केला जात आहे. 

मोठे प्राणी लहान प्राण्यांची शिकार करतात तर लहान प्राणी त्यांच्याहीपेक्षा लहान प्राण्यांना आपले भक्षण बनवतात कधीकधी असे व्हिडीओ पाहून आपल्याला वाईट वाटत पण शेवटी हा निसर्गाचाच समतोल राखण्याचा नियम आहे. 

याआधीही असेच व्हिडीओ खूप पहिले गेले 

महाकाय सरड्याने कासवाची शिकार केल्याचा एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता यावेळी कासवाची झालेली गत पाहता फार दुःख वाटू शकत. महाकाय सारडा पाण्यातून निघून आपल्या जबड्यात कासवाला धरतो, आणि टोकदार दातांनी त्याला दाबून टाकतो. (komodo dragon kill turtle viral video)

बिचारा कासव हतबलपणे आपलं मरण स्वीकारतो कारण त्या सरड्यापुढे त्याच काही होणार नाही हे त्याला कळले असावं बहुधा. असा हा मन हेलावणारा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चालला.