kitchen cleaning hacks: Gas Burner चिकट आणि खराब झालेत का? लिंबाच्या वापराने चमकवा नव्यासारखे

तुमचा गॅस स्टोव्ह काळा झाला असल्यास, तो स्वच्छ करण्यासाठी डिशवॉशिंग साबण किंवा लिक्विड सोप आणि बेकिंग सोडा वापरा

Updated: Nov 18, 2022, 04:01 PM IST
kitchen cleaning hacks: Gas Burner चिकट आणि खराब झालेत का? लिंबाच्या वापराने चमकवा नव्यासारखे title=

Gas burner cleaning hacks: बऱ्याचदा गृहिणी किचनची साफसफाई (kitchen cleaning) करताना एक गोष्ट मात्र साफ करायचं राहून जात आणि ती गोष्ट म्हणजे गॅस बर्नर. (gas burner cleaning) गॅस बर्नर रोज रोज साफ करणं शक्य नसतं. कारण ते काम अतिशय किचकट असतं,पण तुम्हाला माहित आहे का, रोज साफ न केल्याने ते अतिशय चिकट आणि खराब होऊ लागतात आणि एके दिवस काम करायचं बंद होऊन जात. मग आपण ते स्वच्छ करायला बसतो पण त्यावेळी त्यावर इतका मळ आणि चिकटपणा आलेला असतो कि आपल्याला ते स्वच्छ करण कठीण होऊन बसत. (viral trending kitchen hacks how to clean gas burners at home with help of lemon )

गॅस बर्नरच्या छोट्या छिद्रांमध्ये कचरा जमा होऊन जातो आणि परिणामी गॅस वाया  (gas waste) जातो जेवण बनायला वेळ सुद्धा जातो कारण गॅस त्या छिद्रांमधून खूप कमी येतो. स्वयंपाक (cooking) करताना थोडी घाण असणे सामान्य आहे.

पण स्वयंपाकघराची योग्य देखभाल आणि स्वच्छता केली नाही तर त्यात बॅक्टेरिया (bacteria) वाढायला वेळ लागत नाही. गॅस स्टोव्ह (gas stove) ही स्वयंपाकघरातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. स्वयंपाक करताना अनेक वेळा वस्तू त्यावर पडतात.

त्यामुळे ते घाण आणि काळवंडते. गॅस स्टोव्ह साफ करणे हे एक मोठे काम आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगत आहोत, ज्यामुळे तुमचा गॅस स्टोव्ह नवीनसारखा चमकू लागेल. (viral trending kitchen hacks how to clean gas burners at home with help of lemon)

तुम्हाला किचकट वाटणार हे काम एक छोट्याश्या उपायाने सोपं होऊन जाणार आहे आणि यासाठी तुम्हाला फार कष्टसुद्धा घ्यायचे नाहीयेत. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही महत्वाच्या टिप्सविषयी. 

 मीठ आणि लिंबाच्या सालीचा करा वापर (salt and lemon peel)

यासाठी सर्वप्रथम रात्री लिंबू मिसळून पाणी बनवा त्यात रात्रभर गॅस बर्नर भिजवून ठेवा सकाळी लिंबाच्या सालीवर थोडासा मीठ घाला आणि त्या सळईने गॅस बर्नर घासून घ्या... या उपायाने गॅस बर्नर नव्यासारखे चमकतील.. हा उपाय प्रत्येक 10 दिवसांनी करा 

फ्रुट सॉल्टचा करा वापर (fruit salt)

पोटातील गॅसेस घालवण्यासाठी उपयुक्त असणारा सोडा किंवा इनोदेखील गॅस बर्नर साफ करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. यासाठी अर्धा वाटी गरम पाण्यात 1 पॅकेट फ्रूट सॉल्ट, 1 चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचे लिक्विड डिटर्जंट घालून चांगले मिसळा.आता हे मिश्रण गॅस बर्नरवर टाका आणि काही वेळासाठी राहूद्या . 10 मिनिटांनंतर, टूथब्रशने घासल्यानंतर गॅस बर्नर सहजपणे साफ होईल. यासोबतच बर्नरमध्ये साचलेली घाणही निघून जाईल आणि बर्नरची सर्व छिद्रे चुटकीसरशी उघडतील. (viral trending kitchen hacks how to clean gas burners at home with help of lemon)

अमोनिया (amonia)

गॅस स्टोव्ह साफ करण्यासाठी तुम्ही अमोनिया देखील वापरू शकता. त्यासाठी स्टोव्हमधून बर्नर काढून झिप बॅगमध्ये ठेवा. या पिशवीत अमोनिया घाला. गॅस बर्नर रात्रभर असेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी तुम्हाला गॅस बर्नर चमकताना दिसतील.

डिशवॉश आणि बेकिंग सोडा (dishwash baking soda)

तुमचा गॅस स्टोव्ह काळा झाला असल्यास, तो स्वच्छ करण्यासाठी डिशवॉशिंग साबण किंवा लिक्विड सोप आणि बेकिंग सोडा वापरा. यामुळे स्टोव्हची चमक परत येईल. यासाठी एका भांड्यात डिशवॉशर साबण आणि बेकिंग सोडा समान प्रमाणात मिसळा. गॅस स्टोव्ह कापडात किंवा स्पंजमध्ये भिजवून स्वच्छ करा. (viral trending kitchen hacks how to clean gas burners at home with help of lemon )