..आणि मृत बाळ जिवंत झालं..डॉक्टर कि देवदूत..video होतोय व्हायरल

मुलगी जन्माला आल्यावर ना रडली ना तिच्या अंगात हालचाल झाली.नवजात बाळाला लगेच ऑक्सिजन(oxigon) देखील लावण्यात आला, परंतु

Updated: Sep 23, 2022, 06:00 PM IST
..आणि मृत बाळ जिवंत झालं..डॉक्टर कि देवदूत..video होतोय व्हायरल  title=

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media)  दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. या व्हायरल व्हिडिओतील अनेक व्हिडिओ नेटकऱ्यांना खुप आवडतात,तर काही व्हिडिओ असे असतात, जे पुन्हा पुन्हा  नेटकऱ्यांना पाहावेसे वाटतात.

 मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो  आतापर्यंत अनेकांनी पाहिला आहे. आणि या व्हियूडीओची सध्या सगळीकडे एकच चर्चा होत आहे. 

डॉक्टरला देवाचं दुसरं रूप म्हटलं जात त्याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या समोर येतोय. आग्रा येथील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओ मध्ये जी महिला दिसत आहे त्या आहेत डॉक्टर सुरेख चौधरी ज्यांनी ऑक्सिजनच्या रिस्पॉन्स मिळत नसताना स्वतः तोंडाने श्वास देऊन (mouth to mouth )नवजात बालकाला वाचवल. 

डॉ. सुरेखा चौधरी (DR,surekha choudhary gave mouth to mouth a girl and she alive)यांनी सुमारे सात मिनिटे तोंडाला श्वास देऊन नवजात बालकाचे प्राण वाचवले. ही घटना आग्राच्या सीएचसीमध्ये घडली आहे. इथे मुलगी जन्माला आल्यावर ना रडली ना तिच्या अंगात हालचाल झाली.

नवजात बाळाला लगेच ऑक्सिजन(oxigon) देखील लागू करण्यात आला, परंतु यामुळे देखील त्याचे शरीर  अजिबात हललं नाही आणि हे बाळ मृत असल्याचं सर्वाना वाटू लागलं पण यानंतर डॉ. सुरेखा चौधरी यांनी तोंडाने श्वास देण्यास सुरुवात केली

आणि सुमारे 7 मिनिटे त्या करत राहिल्या. यानंतर नवजात बाळाच्या शरीरात हालचाल झाली आणि ती वाचली.