मैत्री की षडंयंत्र? बिबट्या आणि हरणाच्या मैत्रीतील काहीक्षण, पाहा फोटो

एकत्र असं प्रेम करताना आणि खेळतानाचं दृश्य खूपच कमी पाहायला मिळतं.

Updated: Jun 26, 2021, 08:59 AM IST
मैत्री की षडंयंत्र? बिबट्या आणि हरणाच्या मैत्रीतील काहीक्षण, पाहा फोटो title=

मुंबई : इंटरनेटवरील सर्वात सुंदर, पण सगळ्यांना आश्चर्यचकित करणारं फोटो सध्या व्हायरल होत आहे. हा फोटो सुंदर यासाठी आहे की, या फोटोमध्ये एक हरीणाचं बाळ म्हणजेच पाडस आणि बिबट्या दिसत आहे. हा खूप रेअर फोटो आहे. कारण सहसा आपण बिबट्याला हरणाची शिकर करतानाच पाहिले आहे. परंतु एकत्र असं प्रेम करताना आणि खेळतानाचं दृश्य खूपच कमी पाहायला मिळतं.

@JeffreyMWard  नावाच्या एक व्यक्तीने ट्वीटरवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये हरणाचं छोट पाडस बिबट्याच्या समोर उभा आहे आणि बिबट्या त्याच्या खांद्यावर हात टाकून जणू काही त्याच्याशी बोलंत आहे आणि त्याला काही समजवत आहे असे वाटंय. त्याच बरोबर काही फोटोमध्ये या पाडसाने पळण्याचा प्रयत्न केला, परंतु बिबट्याने पाठलाग करुन त्याला गाठले आहे.

हे फोटो दिसायला सुंदर दिसत असले तरी, काही प्राणी अभ्यासकांकडून असे सांगितले जाते की, बघताना जरी हा बिबट्या या पाडसावर प्रेम करताना दिसत असला, तरी याचा अर्थ हा नाही की, बिबट्या खरंच प्रेम करत आहे. हे शिकारी सहसा आपल्या शिकारासोबत बहुतेकदा असे वागतात आणि प्रेमाने त्यांची शिकार करतात.

असे समोर आले आहे की, हा फोटो Greater Kurger National Park, South Africa येथील आहे. हा फोटो 2019 मध्ये Reynard Moolman नावाच्या फोटॉरग्रफरने टिपला आहे. 

सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या फोटोला पाहून लोकं आपआपल्या परीने त्यांच्या मैत्रीचा अर्थ काढत आहेत आणि त्याला शेअर करत आहेत.