रांची : झारखंडची राजधानी रांचीच्या धुर्वा भागात एक वेगळंच प्रकरण पाहायला मिळेलं. इथे नवरी लग्नाला तर उभी राहिली. तिने नवऱ्याला हार घातला. सात फेरे देखील पूर्ण केलं. परंतु नवरा तिच्या भांगात सिंदूर भरत असताना, तिला अचानक असं काही वाटलं की, तिने लग्नाला नकार दिला. तसे पाहाता नवरीने लग्नाला नकार देईपर्यंत बराच उशीर झाला होता. कारण जवळजवळ तिचे लग्न झालेच होते. फक्त सिंदूर भरुन हे लग्न पूर्ण होणार होतं. पण तरीही मुलीने हे लग्न तिला करायचेच नाही असा ठाम निश्चय केला.
नवरा तिच्या भांगात सिंदूर भरत असताना नवरी मंडपातून उठली आणि तिने सांगितले की, तिला नवरा आवडला नाही, म्हणून तिची लग्न करण्याची इच्छा नाही. मुलीच्या या वक्तव्यामुळे नवऱ्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला तर उपस्थित सघल्या पाहूण्यांना धक्का बसला आणि सर्वत्र एकचं खळबळ उडाली.
मुलगी मंडपातून उठून गेल्याची चर्चा सर्वत्र होऊ लागली. त्यानंतर मुलगा त्याच्या कुटूंबीयांसोबत धऱण्यावर बसला आणि त्याने सांगितले की, एकतर हे लग्न होईल किंवा मग आम्हाला लग्नाचा संपूर्ण खर्च परत द्यावा.
कित्येक तास चाललेल्या या फॅमेली ड्राम्यानंतर शेवटी मुलीकडच्यांनी मुलाचे लग्नात खर्च केलेले सर्व पैसे परत देतील असे त्यांना लेखी दिले. ज्यानंतर नवरा लग्न न करता वऱ्हाडयांसोबत परतला.
खरेतर मांडर परिसरातील रहिवासी असलेल्या विनोद लोहराचे लग्न धुर्वा येथील मौसीबाडी येथे राहणाऱ्या चंदाशी होणार होते. ठरलेल्या तारखेनुसार विनोद 29 जून रोजी वऱ्हाड्यांसोबत चंदाशी लग्न करण्यासाठी तिच्या घरी पोहोचला.
सगळं काही चांगलं सुरु होते. लग्नाच्या जवळपास अर्ध्या विधी देखील झाल्या. एकमेकांना हार घातले, सात फेऱ्या देखील झाल्या, पण जेव्हा नवरा तिच्या भांगात भरुन लग्नाची शेवटची रित पूर्ण करणार होता, तेव्हा नवरी मंडपातून उठली आणि मला लग्न करायचे नाही असे सांगून निघून गेली.
वधू अचानक मंडपातून उठल्यानंतर मुलीच्या घरच्यांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, तिने तिच्या घरच्यांना सांगितले की, तिला मुलगा आवडला नाही.
यावर रात्रभर सगळे लोकं मुलीला समजवत होते. पण, मुलगी आपल्या आग्रहावर ठाम राहिली. त्यानंतर मुलीच्या कुटूंबीयांनी नवरा आणि त्याच्या कुटूंबीयांना याबद्दल माहिती दिली.
त्यानंतर मुलीकडच्यांनी लग्नात झालेला खर्च आम्ही पून्हा देऊ असे लेखी आश्वासन दिल्यानंतर नवरदेव आपल्या लग्नाची वरात घेऊन वधू शिवाय आपल्या घरी परतला.