कुत्र्याचे हालहाल करणाऱ्या व्यक्तीचा गायीनं काय केलं पाहा व्हिडीओ

कुत्र्याचे हालहाल करणाऱ्या व्यक्तीसोबत गायीने काय केलं पाहा....  माणसातली माणूसकी संपली असली तरी, प्राण्यांना मात्र आपला धर्म सोडला नाही

Updated: Nov 1, 2021, 05:57 PM IST
कुत्र्याचे हालहाल करणाऱ्या व्यक्तीचा गायीनं काय केलं पाहा व्हिडीओ title=

मुंबई: माणूस माणसांशीच स्वार्थी भावनेतून वागायला लागला आहे. तर प्राण्यांशी तो माणुसकीनं वागेल ही अपक्षेता तर फार दूर आहे. अनेकदा विनाकारण मुक्या प्राण्याना त्रास देणाऱ्या व्यक्तींचे  सोशल मीडियावरून व्हिडीओ समोर आले आहेत. आता मात्र एका प्राण्याने दुसऱ्या प्राण्याचा जीव वाचवल्याचं दिसत आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती कुत्र्याच्या कानांना पकडून त्याचे हाल हाल करत आहे. कुत्र्याला त्रास होताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. कुत्र्याला यातना होत असल्याचं दिसत आहे. कुत्रा यातनेनं विव्हळत आहे. त्याचा आवाज ऐकून त्या व्यक्तीला तर दया येत नाही. तो व्यक्ती कुत्र्याचे कान धरून जोरात ओढत आहे.

कुत्र्याचा आवाज ऐकून गायीला तो संकटात असल्याची जाणीव होते. गाय लगेच तिथे येते. हा सगळा प्रकार पाहून गायीला संताप येतो आणि त्या व्यक्ती बदला घेण्यासाठी ती शिंगांनी उडवून लावते. गाय  कुत्र्याला जीवदान देते. इतकच नाही तर त्रास देणाऱ्या व्यक्तीला आपल्या शिंगांनी मारते. 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याची माहिती मिळू शकली नाही. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप चर्चेत आहे. हा व्हिडीओ पाहून काही युझर्सही म्हणाले आहेत की माणुसकी यांच्याकडून शिकायला हवी. माणसाने माणुसकी सोडली मात्र या प्राण्यांनी आपला धर्म सोडला नाही.