फेसबुक पोस्टवरून बेंगळुरूमध्ये हिंसाचार; दोन ठार, ६० पोलीस जखमी

काँग्रेस आमदाराच्या एका नातेवाईकाने ही पोस्ट शेअर केली.     

Updated: Aug 12, 2020, 08:54 AM IST
फेसबुक पोस्टवरून बेंगळुरूमध्ये हिंसाचार; दोन ठार, ६० पोलीस जखमी title=

नवी दिल्ली : बेंगळुरूमध्ये फेसबुक पोस्टवरून झालेल्या हिंसाचारात दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. शहरातील डीजे हाल्ली आणि केजी हाल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घटली आहे. काँग्रेस आमदाराच्या एका नातेवाईकाने ही पोस्ट शेअर केली. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने मंगळवारी रात्री काँग्रेस आमदाराच्या घरावर हल्ला केला. शिवाय आमदाराच्या घरात घुसून तोडफोड केली. गाड्या देखील पेटवून दिल्या. 

या हिंसाचारामध्ये २ जणांचा मृत्यू झाला असून ६० पोलीस देखील जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीवारात २ जणांचा मृत्यू झाला असून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती बंगळुरुचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी दिली. 

फेसबुकवर मानहानीकारक पोस्ट शेअर करणाऱ्या आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या नातेवाईकाला अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर बंगळुरुमध्ये कलम १४४ लागू करण्यात आल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. 

या हिंसाचारात सहभागी असणाऱ्या १०० लोकांना अटक करण्यात आली आहे. संबंधित काही लोकांना अटक करण्यात येईल. ही घटना जेव्हा घडली तेव्हा आमदार घरामध्ये नव्हते. याप्रकरणी सध्या पोलीस तपास अधिक तपास करत आहेत.