मुंबई : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सर्व क्षेत्रांमध्ये स्पर्धा प्रचंड प्रमाणात वाढली आहे. शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला चांगली नोकरी लागावी अशी अपेक्षा असते. त्यासाठी आधुनिकतेची कास धरणे महत्वाचे ठरते.
सध्या कोणत्याही जॉबसाठी अर्ज करायचा असेल तर, त्यासाठी रिज्युमे गरजेचे असतो. जर तुम्ही अद्यापही वर्ड फाइल किंवा पीडीएफमध्ये रिज्युमे पाठवत असाल तर, थांबा... हा ट्रेंड आता जूना झाला आहे. सध्या व्हिडीओ फॉरमॅटमध्ये रिज्युमे पाठवण्याचा ट्रेंड आहे. या माध्यमातून तुम्ही स्वतःबद्दल फक्त माहितीच नाही तर स्वतःचे स्किल्स युनिक पद्धतीने प्रेझेंट करू शकता.
यासाठी तुम्हाला एक व्हिडीओ शूट करावा लागेल. त्यामध्ये तुमच्या बॉडीच्या वरचा भाग फक्त दिसणे अपेक्षित आहे. प्रभावी संवादासाठी हा एक चांगला पर्याय आहे. हा व्हिडीओ 60 ते 80 सेकंदाचा असावा. यामध्ये आपली प्रोफेशनल माहिती असावी.
या व्हिडीओमध्ये तुमचे हावभाव, कौशल्य, आत्मविश्वास, देहबोली महत्वाचे ठरतील. 60 ते 80 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये तुमच्या प्रोफेशनल करिअरची पारख होऊ शकते.
व्हिडीओ शूट करताना तुमचा पेहराव तसाच असावा जसा, तुम्ही थेट मुलाखतीच्या वेळी परिधान करता.
व्हिडीओ शांत जागी शूट करा. जेणेकरून कोणतेहे पार्श्वआवाज त्यात येणार नाहीत. अशापद्धतीने तुम्ही उत्तम व्हिडीओ शूट केल्यास जॉबसाठी अप्लाय करताना तो व्हिडीओ रिज्युमे पाठवता येईल. आणि तुम्हाला जॉब मिळवणं सोपं जाईल.