फॅक्टरीमध्ये ब्रेड कसा बनवला जातो तुम्हाला माहितीये का?, Video पाहून अंगावर काटा येईल

Bread Factory Viral Video: ब्रेड फॅक्टरीमध्ये कसा बनवला जातो, हे तुम्हाला माहितीये का? सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. तर  

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 7, 2024, 05:07 PM IST
फॅक्टरीमध्ये ब्रेड कसा बनवला जातो तुम्हाला माहितीये का?, Video पाहून अंगावर काटा येईल title=
Video Of Making Bread Procedure In Factory viral video

Bread Factory Viral Video: सोशल मीडियाचा वापर जस जसा वाढला आहे तसा मार्केटिंगची पद्धतही बदलत चालली आहे. हल्ली छोट्यातल्या छोट्या उद्योगाची ब्रँडिग सोशल मीडियावरुन केली जाते. त्यानंतर या वस्तुंची मागणीदेखील वाढायला लागते. तसंच, हॉटेल व्यवसायिकांनीही हा फंडा वापरला आहे. अनेक फुड व्लॉगर मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन तिथल्या पदार्थांची खासियत रिल्समधून सांगतात. मात्र, कधी कधी फुड व्लॉगरमुळं एखाद्या पदार्थाची पोलखोलदेखील होते. 

सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. जे पाहून युजर्सही बुचकळ्यात पडतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दिवसाची सुरुवातच चहा-कॉफीने होत असते. कधी कधी चहासोबत ब्रेड बटर किंवा बिस्किट खाल्ले जाते. नाश्ताबरोबरच सँडविचमध्येही ब्रेड असतो. पण तुम्हाला माहितीये फॅक्टरीमध्ये ब्रेड कसा तयार होतो. अलीकडेच ब्रॅड फॅक्टरीमध्ये तयार होत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ इंटनेटवर खूप व्हायरल होत आहे. हे पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत. 

व्हायरल झालेल्या व्हिडिओत ब्रेड बनवणाऱ्या फॅक्टरीचा दौरा दाखवण्यात आला आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या कानपूर येथील एका फॅक्टरीतील आहे. इथे भरपूर ब्रेडचे पॅकेट पाहायला मिळतात. मल्टग्रेन ब्रेड आरोग्यासाठी पौष्टिक असतो,  असं म्हणतात. मात्र ब्रेड बनवताना स्वच्छतादेखील राखता यायला हवी. तरंच, त्याचा आरोग्याला फायदा होतो. मात्र या व्हिडिओत स्वच्छतेची काळजी घेतली नसल्याचे पाहायला मिळतेय. 

व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहू शकतो की, एक वर्कर एका मिस्करच्या भांड्यात मैदाच्या पोती टाकतात. त्यानंतर त्यात अनेक वेगवेगळे साहित्य टाकतात. हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर पीठाचा गोळा तयार होतो. हे पीठ समान भागात वाटून त्याचे गोळे एका चौकोनी भांड्यात ठेवले जातात. त्यानंतर हे भांडे बेक करण्यासाठी एका मोठ्या ओव्हनमध्ये ठेवण्यात येतात. व्हिडिओत तुम्ही पुढे पाहू शकता की, एका मशीनच्या सहाय्याने बरोबर एका मापात ब्रेडचे स्लाइस कापून येतात. त्यानंतर ब्रेडचे हे स्लाइस कामगार हातात ग्लोव्हस न घातला पिशवीत टाकताना दिसत आहेत.

व्हिडिओ शेअर करताना व्लॉगरने कॅप्शनदेखील लिहलं आहे. यात लिहलं आहे की ब्रेड मेकिंग इन फॅक्टरी. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत स्वच्छतेची चांगलीच काळजी घेतली जात आहे, असा उपरोधिक टोला लगावला आहे. तसंच, बेक होऊन आलेले ब्रेड त्या हिरव्या चटईवर असेच पसरवले जात आहेत. त्यानंतर एका कळकट निळ्या रंगाच्या कंटेनरमध्ये हे सगळे ब्रेड ठेवले जात आहे. ब्रेड मेकिंगच्या या पूर्ण प्रक्रियेदरम्यान एका पण कामगाराने हातात ग्लोव्हस घातले नाहीयेत.