VIDEO: होळी निमित्त आयोजित कार्यक्रमात सुरु होता अश्लील डान्स, अचानक सुरु झाला गोळीबार

भारतामध्ये होळीचा सण वेगवेगळ्या आणि पारंपरिक पद्धतीने जल्लोषात साजरा केला जातो. अशाच प्रकारे एका कार्यक्रमाचं आयोजन उत्तरप्रदेशातील मथुरा येथे करण्यात आलं होतं. मात्र, या कार्यक्रमात असं काही घडलं जे पाहून सर्वांनाच धक्का बसला.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Feb 26, 2018, 03:46 PM IST
VIDEO: होळी निमित्त आयोजित कार्यक्रमात सुरु होता अश्लील डान्स, अचानक सुरु झाला गोळीबार title=

नवी दिल्ली : भारतामध्ये होळीचा सण वेगवेगळ्या आणि पारंपरिक पद्धतीने जल्लोषात साजरा केला जातो. अशाच प्रकारे एका कार्यक्रमाचं आयोजन उत्तरप्रदेशातील मथुरा येथे करण्यात आलं होतं. मात्र, या कार्यक्रमात असं काही घडलं जे पाहून सर्वांनाच धक्का बसला.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

मथुरात आयोजित या कार्यक्रमात एका तरुणाने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे.

स्टेजवर सुरु होता अश्लील डान्स

मथुरातील शेरगढ परिसरात होळी दरम्यान आयोजित कार्यक्रमात स्टेजवर अश्लील डान्स सुरु होता. त्याच दरम्यान एक तरुण स्टेजवर चढला आणि तरुणीसोबत जबरदस्तीने डान्स करण्याचा प्रयत्न करु लागला. मात्र, आयोजकांनी याला विरोध केला.

(व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

आपल्याला विरोध केल्यानंतर संतापलेल्या त्या तरुणाने हवेत गोळीबार करण्यास सुरुवात केली. यानंतर त्याच्यासोबत उपस्थित असलेल्या मित्रानेही हवेत गोळीबार केला.

ग्रामस्थांनी गेली धुलाई 

गोळीबार केल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी दोन्ही आरोपींना पकडून त्यांची जोरदार धुलाई केली. दोन्ही आरोपी हे दारुच्या नशेत होते. सुदैवाने आरोपींनी केलेल्या गोळीबारात कुणालाही दुखापत झाली नाही.

एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी एका तरुणाला ताब्यात घेतलं. तर, दुसरा आरोपी फरार झाला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.