Vande Bharat Train: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अहमदाबाद येथून व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून आग्रा आणि वाराणसी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. आग्रा-वाराणसी रेल्वे मार्गावरील इटावा स्थानकातही प्रवाशांनी वंदे भारतचे स्वागत केले. यावेळी राजकीय नेतेही वंदे भारतच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी इटावा स्थानकात पोहोचले होते. इटावाच्या आमदार सरिता भदौरिया यादेखील वंदे भारत ट्रेनचे स्वागत करण्यासाठी स्थानकात पोहोचल्या होत्या. मात्र, त्याचवेळी त्यांच्यासोबत एक अपघात घडला यात या अपघातातून त्या थोडक्यात बचावल्या.
आमदार सरिता भदौरिया इटावा रेल्वे स्थानकात वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी पोहोचल्या होत्या. त्या प्लॅटफॉर्मवर उभं राहून वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवत होत्या. त्याचवेळी प्लॅटफॉर्मवर धक्का-बुक्की झाली. त्या दरम्यान भदौरिया यांचा पाय घसरल्याने त्या रेल्वे रूळांवर जाऊन पडल्या. यावेळी ट्रेन तिथेच उभी होती. भाजप आमदार रेल्वे रूळांवर पडल्याने ट्रेनच्या लोको पायलटने हॉर्न वाजवला तर प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या नेत्यांनी ट्रेन पुढे जाण्यापासून थांबवण्याचा इशारा दिला.
इटावाच्या आमदार सरिता भदौरिया या रेल्वे रूळांवर पडताच भाजप कार्यकर्ते त्यांना वाचवण्यासाठी पुढे सरसावले. त्यांना तडकाफडकी प्लॅटफॉर्मवरुन उचलण्यात आलं. सुदैवाने त्यांना कोणतीही गंभीर इजा झाली नाही त्यामुळं मोठी दुर्घटना टळली आहे. इटावा रेल्वे स्थानकात वंदे भारत ट्रेनचे स्वागत करण्यासाठी समाजवादी पार्टीचे खासदार जितेंद्र दोहरे, माजी भाजप खासदार रामशंकर कठेरिया, भाजपचे राज्यसभा खासदार गीता शाक्यसह सपा आणि भाजपपचे कार्यकर्ते होते.
ख़बरों की तह तक..
बड़ा हादसा टला.
संभलिए विधायक जी.
आगरा-बनारस वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन को हरी झंडी दिखाने का कार्यक्रम अव्यवस्थाओं की भेंट चढ़ गया ट्रेन को झंडी दिखाते समय भाजपा की इटावा सदर विधायक सरिता भदौरिया वंदे भारत ट्रेन के सामने जा गिरीं..#VandeBharatExpress । #Etawah pic.twitter.com/F2YBRkPDLS— chairman(news editor)..जब कोई आपकी बात न सुने (@president_ngo) September 16, 2024
दरम्यान, वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंड दाखवण्यासाठी समाजवादी पार्टी आणि भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा लागल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची जुंपली होती. आग्रा-वाराणसी वंदे भारत ट्रेन आग्रा कँटवरुन संध्याकाळी 4.15 वाजता सुटणार असून टुंडला येथे संध्याकाळी 5:05 वाजता, इटावा येथे 6:05 वाजता, कानपूर येथे 7:50 वाजता थांबेल आणि 11:55 वाजता वाराणसीला पोहोचेल. तर, वाराणसीहून दुपारी साडे बारा वाजता सुटून सकाळी ८ वाजता आग्रा पोहोचेल. आग्रा-वाराणसी वंदे भारत ट्रेन शुक्रवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावेल.