सरन्यायाधींच्या विरोधातील महाभियोगाची नोटीस उपराष्ट्रपतींनी फेटाळली

सर्व आरोप चूकीचे असल्याचं उपराष्ट्रपतींचं मत

Updated: Apr 23, 2018, 02:35 PM IST
सरन्यायाधींच्या विरोधातील महाभियोगाची नोटीस उपराष्ट्रपतींनी फेटाळली title=

नवी दिल्ली : सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याची विरोधीपक्षांची नोटीस आज उपराष्ट्रपती व्यैकंय्या नायडूंनी फेटाळून लावली आहे. सरन्यायाधीशांविरोधात विरोधीपक्षांनी लावलेले सर्व आरोप चूकीचे असल्याचं उपराष्ट्रपतींच्या आदेशात म्हटलं आहे. 71 खासदारांच्या स्वाक्षऱ्यांनी महाभियोगाची नोटीस 20 एप्रिल रोजी देण्यात आली होती.

या 71 खासदारांमध्ये काँग्रेस, माकप, भाकप, सपा, बसपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुस्लीम लीग या पक्षांच्या खासदारांचा समावेश होता. उपराष्ट्रपतींनी हा प्रस्ताव पहिल्या दिवशी केराच्या टोपलीत टाकायला हवा होता असं मत भाजप खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केलं आहे.