मुंबई : राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात शनिवारी हक्कभंगाची नोटीस दिलीय.
नायडू यांनी ही नोटीस लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठवलीय.
भाजपचे राज्यसभेचे खासदार भूपिंदर यादव यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात हक्कभंगाची तक्रार दाखल केली होती. एका ट्वीटमध्ये राहुल गांधी यांनी राज्यसभेच्या अधिकारांबाबत आणि त्यात घेतल्या जाणा-या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.
ट्वीटमध्ये त्यांनी अरूण जेटली यांचे स्पेलिंग जाणूनबुजून चुकीचं लिहिल्याचं यादव यांनी सांगितलं. जेटली यांच्या स्पेलिंगच्या शेवटी राहुल यांनी एलवायई (LYE )ऐवजी एलआयई (lie)अर्थात खोटं असं लिहिलं होतं. या प्रकारामुळे राहुल गांधी यांनी राज्यसभेतील भाजपचे नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचा अवमान केल्याचं सांगत हक्कभंग झाल्याचा दावा यादव यांनी केलाय.