फेक अकाऊंटवरून विद्यार्थिनीचे अश्लिल फोटोज केले अपलोड...

 फेसबुकवर फेक अकाऊंट ओपन करून मुलीचे अश्लिल व्हिडीओ आणि फोटोज अपलोड केल्याची तक्रार एका व्यक्तीने पोलिसांत केली आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 14, 2017, 04:52 PM IST
फेक अकाऊंटवरून विद्यार्थिनीचे अश्लिल फोटोज केले अपलोड... title=

नोएडा : फेसबुकवर फेक अकाऊंट ओपन करून मुलीचे अश्लिल व्हिडीओ आणि फोटोज अपलोड केल्याची तक्रार एका व्यक्तीने पोलिसांत केली आहे. ही व्यक्ती नोएडा येथील सेक्टर ४९ मध्ये राहते. पोलीस निरीक्षक विनय प्रकाश सिंह यांनी या प्रकरणाचा खुलासा केला. 

या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार फेक फेसबुक आयडी पोस्ट केलेले व्हिडीओज आणि फोटोज त्यांच्या मुलीने पाहिले आहेत. हे अकाऊंट तिने ओपन केले नसल्याचे तिचे म्हणणे आहे. मग तिच्या नावाने हे अकाऊंट कोणी ओपन केले असावे ? हा प्रश्न आहे.  त्यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून त्याचा अधिक तपास सुरु आहे.