गूड न्यूज...बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी, जागांची संख्याही जास्त

बँकिग सेक्टरमध्ये भविष्य  घडवू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 

Updated: Aug 11, 2021, 04:58 PM IST
गूड न्यूज...बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी, जागांची संख्याही जास्त   title=

मुंबई : बँकिग सेक्टरमध्ये भविष्य  घडवू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आयडीबीआय बँकेत (IDBI Bank) असिस्टेंट मॅनेजर  (IDBI Bank Assistant Manager Grade ‘A’) या पदासाठी जागा निघाल्या आहेत. थोडक्यातच या पदभरतीमुळे तुम्हाला बँक अधिकारी होण्याची संधी आहे. बँकेच्या निकषांनुसार जर तुम्ही योग्य उमेदवार असाल, तर तुम्हीही या पदासाठी अर्ज करु शकता. अर्ज कसा करायचा, एकूण किती जागांसाठी ही भरती आहे, याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात. (Vacancy for the post of officer in IDBI Bank know how to apply)

कोणत्या पदासाठी भरती?  

पदनाम - असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए (Assistant Manager Grade ‘A’)
एकूण जागा - 650
पे स्केल - 36 हजार दरमहा
वयोमर्यादा - 21 ते 28 वर्ष
शैक्षणिक पात्रता - उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. त्याला फर्स्ट क्लास (60 Percent) असावा.  मागासवर्गीय उमेदवारांसाठी टक्क्यांच्या अटीतून 5 ट्कके शिथिलता असेल. 
नोकरीचं ठिकाण - संपूर्ण भारत. 

अर्ज शुल्क 

वरील पदासाठी अर्ज करण्याऱ्या सर्वसामान्य प्रवर्गातील अर्ज शुल्कासाठी 1 हजार रुपये मोजावे लागतीस. तर हेच शुल्क SC/ST/PWD प्रवर्गताली उमेदवारांसाठी 200 रुपये इतका असेल.  उमेदवार हे शुल्क क्रेडिट, डेबिट आणि कॅश कार्डाच्या मदतीने भरू शकतात.  

महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज करण्याचा पहिला दिवस - 10 ऑगस्ट 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 ऑगस्ट 2021
ऑनलाइन टेस्ट कधी? 4 सप्टेंबर 2021 

अर्ज कसा करायचा?  

इच्छूक उमेदवार बँकेच्या http://www.idbi.com या अधिकृत वेबसाईटवरुन ऑनलाईन अर्ज करु शकतात. यासाठी आधी रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक असणार आहे. त्यानंतरच तुम्हाला अर्ज करता येईल.

निवड कशी होणार?  

उमेदवारांची निवड ही ऑनलाईन परीक्षा तसेच इंटरव्यूच्या माध्यमातून केली जाईल. जे उमेदवार ऑनलाईन परीक्षा पास करतील, त्यांनाच मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. तसेच परीक्षेत नेगिटिव्ह मार्किंग पद्धतीने गुणांकन केले जाईल.