रुद्रप्रयाग (हरेन्द्र नेगी) : उत्तराखंडमधील जनपद रुद्रपयागमध्ये सातवीत शिकणाऱ्या १३ वर्षाच्या मुलीने पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे.
यामध्ये डोंगरी भागात राहणाऱ्या लोकांना येणाऱ्या समस्यांबद्दल तिने सांगितले आहे.
उत्तराखंडपासून २५० कि.मी दूर असलेल्या नगर पंचायत गैरसेंण ला राजधानी बनविण्याची विनंती तिने केली आहे.
डोंगरांमूळे मुली शिकायला बाहेर पडत नाहीत मग 'मुलगी वाचवा-मुलगी शिकवा' हे अभियान पूर्ण कसे होणार ? असा प्रश्न तिने पंतप्रधानांना केला आहे.
'मोदी सर, तुम्ही श्रीनगर गढवालबद्दल एका भाषणात उल्लेख केलात ते मला खूप आवडले.
माझे बाबा म्हणतात जर गैरसेंण ही राजधानी झाली तर गावात कोणती समस्या राहणार नाही. नेता आणि अधिकारी आपल्यासारखे डोंगरात राहिले तर त्यांना आपल्या समस्या कळतील.'
'गावातील अधिकांश शाळांमध्ये शिक्षकच नाहीएत. कित्येक शाळांमध्ये तर शौचालय आणि पिण्याचे पाणीदेखील नाही.
यामूळे आम्हा मुलींना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. माध्यमिक नंतरचे पुढील शिक्षणासाठी शाळा, कॉलेज खूप दूर आहेत.
त्यामूळे मुलींचे आई-बाबा त्यांना शिक्षणासाठी सोडत नाहीत.' असेही तिने पत्रात म्हटले.