नवविवाहिता तिच्या रुममध्ये प्रियकराबरोबर सापडली! पतीने रंगेहाथ पकडताच केली अजब मागणी

Husband Found Wife With Boyfriend At Home: दुपारी अचानक या महिलेचा पती घरी आला असता त्याला पत्नीच्या रुममध्ये एक अनोळखी पुरुष दिलसा आणि त्याचा रागाचा पार चढला. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जे काही घडलं ते फारच थक्क करणारं होतं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 18, 2024, 02:02 PM IST
नवविवाहिता तिच्या रुममध्ये प्रियकराबरोबर सापडली! पतीने रंगेहाथ पकडताच केली अजब मागणी title=
पतीला समोरचं दृष्य पाहून धक्काच बसला (प्रातिनीधिक फोटो)

Husband Found Wife With Boyfriend At Home: उत्तर प्रदेशमधील संबळमधील नखासा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावामध्ये एका विवाहित महिलेला भेटण्यासाठी तिला प्रियकर पोहोचला. या महिलेच्या पतीने दोघांना रंगेहाथ पकडलं. या दोघांना पतीने बेदम मारहाण केली. तसेच 112 क्रमांकावर फोन करुन या व्यक्तीने पत्नीचा प्रियकर तिला भेटायला आला होता अशी माहिती पोलिसांना दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली. पोलीस या महिलेला आणि तिच्या प्रियकराला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. या महिलेचा पतीही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. पोलीस स्टेशनला पोहचल्यानंतर या महिलेने एक विचित्र मागणी केली. या महिलेची मागणी ऐकून सर्वांनाच धक्का बसला. या महिलेने मला माझ्या प्रियकराबरोबर राहायचं आहे, अशी मागणी या महिलेने केली.

पती अचानक घरी पोहोचला

ही विवाहित माहिला संबळ पोलीस स्टेशनमधील असमोली श्रेत्रातील रहिवाशी आहे. 3 महिन्यांपूर्वी हजरत नगर गढी पोलीस स्टेशनच्या क्षेत्रामध्ये मुस्लीम रीति रिवाजांनुसार या महिलेचा निकाह झाला होता. 2 महिने ही महिला आपल्या सासरवाडीमध्ये पतीबरोबर अगदी आनंदाने राहिली. मात्र नंतर वाद होऊ लागल्याने ही महिला संबळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नखासा येथे एका भाडे तत्वावर घेतलेल्या घरात राहू लागली. मागील गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास विवाहितेचा पती ती राहत असलेल्या भाड्याच्या घरी पोहोचला तर त्याला घरी पत्नी प्रियकराबरोबर असल्याचं दिसून आलं.

दोघेही तुरुंगात

अनोळखी व्यक्तीला पत्नीच्या रुममध्ये पाहून पती चांगलाच संतापला. पतीने तत्काळ या घटनेची माहिती 112 क्रमांकावर फोन करुन दिली. माहिती मिळाल्यानंतर काही वेळात पोलीस या घरी पोहोचले. मात्र तोपर्यंत पतीने या दोघांना बरीच मारहाण केली होती. पोलिसांनी पती आणि त्याच्या पत्नीच्या प्रेयसीला शांतता भंग केल्याप्रकरणी कलम 151 अंतर्गत संभळ कोर्टामध्ये हजर केलं. या दोघांनाही तुरुंगात पाठवण्यात आलं आहे.

दुसऱ्या दिवशी ती पोलीस स्टेशनला आली अन्...

शुक्रवारी ही महिला आपल्या नातेवाईकांसहीत पोलीस स्टेशनला पोहोचली आणि तिने प्रियकराबरोबर आपल्याला निकाह करायचा असल्याचा हट्ट धरला. "माझं लग्न अडीच महिन्यांपूर्वी झालं आहे. माझ्या पतीने मला प्रियकराबरोबर पाहिलं. दोघेही सध्या तुरुंगात आहेत. माझं मागील 5 वर्षांपासून अपेअर सुरु होतं. मला माझ्या प्रियकराबरोबर निकाह करायचा आहे. माझा निकाह माझ्या प्रियकराबरोबर लावून द्यावा किंवा त्याला सोडून देण्यात यावं," असं या महिलेने पोलिसांना सांगितलं.

महिलेच्या पतीला आणि प्रियकरला तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.