चंद्राच्या पृष्ठभागावार 54 वर्षांपासून पडलं आहे एक सिक्रेट यंत्र, आजही अगदी ठणठणीत; पण हे कोणी ठेवलंय?

चांद्रयान 3 (Chandrayaan 3) ने आज संध्याकाळी चंद्रावर लँडिग करताच भारताचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिलं जाईल. 54 वर्षांपूर्वी अमेरिकेने जेव्हा अपोलो 11 (Applo 11) मिशलना लाँच केलं होतं, तेव्हा एक इतिहास घडवला होता. ज्याची चर्चा आजही होत असते.   

शिवराज यादव | Updated: Aug 23, 2023, 03:10 PM IST
चंद्राच्या पृष्ठभागावार 54 वर्षांपासून पडलं आहे एक सिक्रेट यंत्र, आजही अगदी ठणठणीत; पण हे कोणी ठेवलंय? title=

भारताच्या चांद्रयान 3 (Chandrayaan 3) मोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. चांद्रयान 3 आज संध्याकाळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील (South Pole) पृष्ठभागावर लँडिग करण्याच्या तयारीत आहे. याआधी कोणत्याही देशाला ही कामगिरी करता आलेली नाही. आज सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान चंद्रावर लँडिंग करणार आहे. भारताच्या या चांद्रयान मोहिमेमुळे अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या अपोलो 11 च्या आठवणी जागा झाल्या आहेत. 20 जुलै 1969 रोजी नासाने अपोलो 11 ला चंद्रावर उतरवलं होतं. त्यावेळी नील आर्मस्ट्राँग या मोहिमेचे कमांडर होते. त्यावेळी बज आल्ड्रिनही चंद्रावर गेले होते. दरम्यान, दोघे चंद्रावर उतरले तेव्हा त्यांनी तिथे एक असं यंत्र बसवलं होतं जे आजही काम करत आहे. 

नील आर्मस्ट्राँग आणि बज आल्ड्रिन यांनी चंद्रावर जे यंत्र बसवलं होतं, त्याला 'रेट्रोरिफ्लेक्‍टर' म्हणून ओळखलं जातं. हे एक लेजर रेंजिंग रेट्रोरिफ्लेक्टर (LRRR) आहे, हे रेट्रोरिफ्लेक्‍टर पृथ्वीवर लक्ष ठेवण्याच्या हेतूने बसवण्यात आलं आहे. हे यंत्र फ्यूज्ड सिलिकाच्या चौकोनी तुकड्यांपासून तयार करण्यात आलं आहे. . या LRR द्वारे पृथ्वीवरून चंद्रावर पाठवलेले लेझर-रेंजिंग बीम तपासले जातात. यामुळे शास्त्रज्ञांना चंद्र आणि पृथ्वीमधील अचूक अंतर मोजण्यात मदत होते. पृथ्वीवर परत येणाऱ्या प्रकाशाची वेळ मोजून दोघांमधील अंतर मोजले जाते.

पण याचं नेमकं काम काय?

जर्नल सायन्समधील लेखानुसार, हे मोजमाप इतके अचूक असू शकते की वास्तविक आकृतीपासून कमाल फरक सहा इंचांपर्यंत असू शकतो. सायंटिफिक अमेरिकनच्या मार्च 1970 च्या अंकात जेम्स फॉलर आणि जोसेफ वुमलर यांनी लिहिले की, कोणत्याही विशिष्ट क्षणी पृथ्वी आणि चंद्र यांच्यात पूर्ण अंतर नसून काही महिने आणि वर्षांच्या कालावधीत सहा इंच किंवा त्याहून अधिक अचूकतेने मोजलेलं अंतर आहे. अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी अशा फरकांचा अभ्यास केला जाऊ शकतो. 

जेव्हा यंत्र हरवलं होतं

LRRR चंद्रावर ठेवण्यात आले होते. तर आणखी चार रेट्रो रिफ्लेक्टर्सही पृथ्वीवर ठेवण्यात आले आहेत. यापैकी तीन अमेरिकेच्या अपोलो मिशनने ठेवले होते तर बाकीचे सोव्हिएत युनियनच्या लुना मिशनने सेट केले होते. सोव्हिएत युनियनच्या लुनोखोड 1 म्हणजेच लुना-1 ने पहिले रेट्रोरिफ्लेक्टर ठेवले होते. Space.com च्या मते, सोव्हिएत युनियनचे 17 नोव्हेंबर 1970 रोजी चंद्रावर ठेवलेले रेट्रोरिफ्लेक्टर हरवले आहे. 14 सप्टेंबर 1971 पासून त्याची कोणतीच माहिती समोर आली नव्हती. पण 2010 साली खगोल भौतिकशास्त्रज्ञांनी त्याचा पुन्हा शोध लावला. इतर सर्व रेट्रोरिफ्लेक्टर्स, तसेच, अजूनही कार्यरत आहेत.