UPI पेमेंट फेल गेले तर भरपाई म्हणून बँक रोज देणार 100 रुपये, येथे करा तक्रार

 UPI Payment Failed : यूपीआय पेमेंट अयशस्वी झाले तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे.  

Updated: Apr 6, 2021, 03:34 PM IST
UPI पेमेंट फेल गेले तर भरपाई म्हणून बँक रोज देणार 100 रुपये, येथे करा तक्रार  title=

मुंबई : UPI Payment Failed : यूपीआय पेमेंट अयशस्वी झाले तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे. 1 एप्रिल 2021 रोजी नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले, देशातील सरकारी आणि खासगी बँकांमध्ये कोणतेही काम झाले नाही. त्या दिवशी काही बँकांचे यूपीआय ( UPI) आणि आयएमपीएस ( IMPS) व्यवहार अयशस्वी झाले. अशा परिस्थितीत ग्राहकांचे पैसेही अडकले. आपला यूपीआय (UPI) व्यवहार अयशस्वी झाल्यास आणि आपल्या बँक खात्यावर वेळेवर पैसे परत आले नाही तर काय करावे हे आम्ही सांगणार आहोत.

1 एप्रिल 2021 रोजी UPI व्यवहार फैल 

The National Payments Corporation of India (NPCI) एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, 1 एप्रिल रोजी संध्याकाळपर्यंत बहुतेक बँकांचे व्यवहार सुरळीत झाले आहेत. ग्राहकांना अखंडित आयएमपीएस आणि यूपीआय सेवा घ्याव्या लागल्या. परंतु असे असूनही, व्यवहार अयशस्वी झाल्यानंतर त्यांना पैसे परत मिळालेले नाहीत, अशी अनेक ग्राहकांची तक्रार आहे.

ही आहेत आरबीआयची (RBI)मार्गदर्शक तत्त्वे 

जर तुम्हीही अशा लोकांपैकी असाल, ज्यांचा व्यवहार अयशस्वी झाला असेल तर ऑक्टोबर 2019 मधील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI)मार्गदर्शक सूचनांविषयी माहिती असावी. यामुळे तुमची अडचण सुटण्यास मदत होईल. या परिपत्रकाअंतर्गत पैशांच्या व्यवहारसाठी (पैसे पत येण्यासाठी) काही अंतिम मुदत देण्यात आली आहे. जर या मुदतीत व्यवहाराची पूर्तता किंवा पूर्ववत कार्यवाही केली गेली नाही तर बँकेला ग्राहकांना भरपाई द्यावी लागेल. परिपत्रकानुसार अंतिम मुदत संपल्यानंतर प्रतिदिन 100 रुपये दराने भरपाई द्यावी लागेल.

परिपत्रकानुसार, जर यूपीआय व्यवहार अयशस्वी झाला आणि ग्राहकांच्या खात्यातून पैसे कापले केले गेले, परंतु पैसे लाभार्थीच्या खात्यात पुन्हा आलेच नाहीत, तर व्यवहाराच्या तारखेपासून टी +1 दिवसात  पूर्ण केले पाहिजे. येथे टी म्हणजे व्यवहाराचा दिवस आणि +1 म्हणजे एक दिवस किंवा 24 तास.

येथे तक्रार करु शकता

सर्व प्रथम, आपण सेवा प्रदात्याकडे तक्रार केली पाहिजे. आपल्याला  Raise Disputeकडे जावे लागेल.  येथे आपली तक्रार नोंदवा. आपली तक्रार योग्य झाल्यावर प्रोव्हायडर पैसे परत करेल. तक्रार करुनही बँकेकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास रिझर्व्ह बॅंकेच्या लोकपाल योजना डिजिटल व्यवहारांच्या  2019 च्या अंतर्गत आपण तक्रार करु शकता.