पतीची हत्या केली, रात्रभर मृतदेहाशेजारी झोपली... 'मुलांना सांगितलं पप्पांना उठवू नका'

हत्या केल्यानंतर तीने पतीचा अचानक मृत्यू झाल्याचा बनाव रचला, तब्बल दोन दिवस तीने मृतदेह घरात ठेवला, पण शेवटी असा झाला पर्दाफाश

Updated: Dec 20, 2022, 11:32 AM IST
पतीची हत्या केली, रात्रभर मृतदेहाशेजारी झोपली... 'मुलांना सांगितलं पप्पांना उठवू नका' title=

Crime News : पतीला दांडक्याने मारहाण करत त्याची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पतीला दारूचं व्यसन होतं. दारू पिऊन आल्यानंतर तो पत्नीला शिविगाळ करत मारहाण करत असे. दररोजच्या या त्रासाला ती महिला कंटाळली होती. अखेर तीने पतीला संपवण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली असून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. आरोपी महिला ब्यूटी पार्लर चालवून आपल्या मुलांचं पालनपोषण करत होती. (wife killing her husband slept with dead body)

असा रचला हत्येचा प्लान
उत्तरप्रदेशमधल्या रायबरेली इथली ही धक्कादायक घटना आहे. 15 डिसेंबरच्या रात्री मृत व्यक्ती नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला. यानंतर त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीमुळे संतापलेल्या पत्नीने संधी मिळताच पतीच्या डोक्यात जड वस्तूने हल्ला केला. या हल्ल्यात पती जागीच कोसळला. यानंतर पत्नीने त्याचा गळा दाबून त्याची हत्या केली.

रात्रभर मृतदेहाशेजारी झोपली
पतीची हत्या केल्यानंतर आरोपी महिला मृतदेहाच्या बाजूला रात्रभर आरामात झोपली. सकाळ उठल्यानंतर तीने पप्पांना झोपेतून उठवू नका, नाही तर ते रागावतील असं सांगत ब्यूटी पार्लरमध्ये कामासाठी गेली. दिवसभर तीने ब्यूटी पार्लरमध्ये काम केलं. त्यानंतर संध्याकळी घरी घेऊन मुलांना जेवण दिल्यानंतर त्यांना झोपवलं. रात्री संधी मिळताच तिने पतीचा मृतदेह खेचत घराच्या गेटवर आणून टाकला आणि पुन्हा झोपी गेली. सकाळी उठून तीने आरडा ओरडा सुरु केला. अति दारू प्यायलाने पतीचा मृत्यू झाल्याचा कांगावा तीने सुरु केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

पोलिसांना आला संशय
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. पत्नीच्या जबाबात पोलिसांना संशयास्पद गोष्टी आढळल्या. संशयावरुन पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरु केली. पोलिसी खाक्या दाखवताच पत्नीने आपला गुन्हा कबूल केला. पतीच्या हत्येच्या आरोपात पत्नी अनुला पोलिसांनी अटक केली.

आरोपी महिलेचं ब्युटी पार्लर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिलेचं गावात ब्युटी पार्लर आहे. पती नोकरीधंदा करत नव्हता. त्यामुळे आरोपी महिला ब्युटीपार्लरमधून मिळणाऱ्या पैशातून आपल्या मुलांचं पालनपोषण करत होती. पण पती दारू पिण्यासाठी दररोज तिच्याकडून पैसे मागत असे. पैसे न दिल्यास तिला मारहाण केली जात होती. याचे परिणाम त्यांच्या मुलांवरही होत होते.

दररोजच्या या त्रासाला आरोपी पत्नी वैतागली होती. त्यामुळे तीने पतीला संपवण्याचा निर्णय घेतला. पण अखेर पोलिसांनी तिला अटक केली.