UP Crime: नवरा आणि बायकोच्या नात्यात एकमेकांप्रती विश्वास असतो. कितीही भांडण झालं तरी एकमेकांना संभाळून घेतलं जातं.पण अनेकदा दोघांमध्ये काहीतरी बिनसत आणि त्याने नात्यावर परिणाम होतो. उत्तर प्रदेशच्या झासी जिल्ह्यात एक प्रकार समोर आलाय. आपण काबाडकष्ट करुन पत्नीला शिकवले पण सरकारी नोकरी पळून गेल्यानंतर ती सोडून गेल्याचा आरोप पतीने केलाय. आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी पतीने काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केलेयत. काय घडलाय हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.
नीरज विश्वकर्मा आणि ऋचा यांनी 6 फेब्रुवारी 2022 ला विवाह केला होता. त्याआधी 5 वर्षे ते एकमेकांना भेटत होते.यानंतर त्यांनी आपली मैत्री नात्यामध्ये बदलण्याचा निर्णय घेतला. नीरजची पत्नी ऋचाला अकाऊंटंट म्हणून नोकरी मिळाली. यानंतर तिने आपल्याला सोडून दिल्याचे नीरजचे म्हणणे आहे. याप्रकरणी नीरजने डीएमना पत्र लिहून त्यांच्याकडे तक्रार केली आहे. माझी पत्नी माझ्याशी आता बोलत नाही. माझे फोनदेखील उचलत नाही.आम्ही 18 जानेवारी 2024 ला शेवटचे भेटलो होतो. तेव्हा ती घरुन बाहेर पडली ती अद्यापही परत आली नसल्याचे नीरजने आपल्या तक्रारीत म्हटलंय. मला कॉलेजला जायचंय असं ऋचा म्हणत होती,असेही त्याने पुढे सांगितले.
अकाऊंटट पदासाठी नियुक्ती पत्र घ्यायला ऋचा जाणार असल्याचे समजताच नीरज कलेक्टर ऑफिसमध्ये पोहोचला. पण त्याला भेटण्याऐवजी ऋचा दुसऱ्या दाराने निघून गेली, असे नीरजने म्हटलंय.
साधारण अडीच वर्षांपूर्वी आम्ही औरछा मंदिरात लग्न केलं होतं. यानंतर मला शिकायची इच्छा असल्याचे ऋचा म्हणाली होती. मी मजूरी करुन तिला शिकवलं.यासाठी मला कर्जदेखील घ्यावं लागलं. पण जॉईनिंग लेटर मिळाल्यावर ती बदलली. आणि नियुक्ती पत्र माझ्यापासून लपवून ती आता पळून गेली, असे नीरजने म्हटले आहे. या दोघांमध्ये वाद सुरु होते.त्यानंतर ऋचा आपल्या माहेरी गेली होती. यानंतर नीरज विवाह अधिकारांसंबंधी कलम 9 अधिनियम 1955 अंतर्गत फॅमिली कोर्टात गेला. यानुसार पती आणि पत्नी दोघांपैकी एक कोणत्याही योग्य कारणाशिवाय दुसऱ्यापासून वेगळा होत असेल तर दुसरा पक्ष कोर्टात याचिका दाखल करु शकतो. दाखल केलेल्या तक्रारीनुसार नीरजने ऋचाला घरी बोलावले होते. पण नोकरी लागल्यानंतर त्यांच्यात भेट झाली नाही.
एकदा डीएम कार्यालयात दोघांची भेट झाली होती. त्यावेळी एसडीएमकडे जा आणि आपलं लग्न झालं नव्हतं असं शपथपत्र दे,असे ती मला सांगत होती. पण आमचं लग्नचं झालं नाही, असं ती कसं म्हणून शकते? असे नीरजने विचारले. तो ऋचाशी फोनवर बोलला. पण तिने कॅमेरासमोर येऊन स्पष्टीकरण देण्यास नकार दिला. मी नीरजसोबत लग्नच केलं नाही. तो नेहमी दारुच्या नशेत असतो. आम्ही रिलेशनमध्ये होतो पण लग्न केलं नव्हतं, असं तिचं म्हणणं आहे. मला बदनाम करण्याचे षढयंत्र असल्याची बाजू ऋचा मांडत आहे.