Boat Accident: नदीत बोट उलटली, रक्षाबंधनासाठी गेलेले 20 जण बुडाले

बोटीत 35 ते 40 प्रवासी असल्याची माहिती, घटनास्थळी बचावकार्याला वेग

Updated: Aug 11, 2022, 07:50 PM IST
Boat Accident: नदीत बोट उलटली, रक्षाबंधनासाठी गेलेले 20 जण बुडाले title=

Banda Boat Accident : रक्षाबंधनासाठी एका गावाहून दुसऱ्या गावी जाणारी प्रवासी बोट नदीत उलटल्याने बोटीतील 20 जण बुडाले. यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधल्या बांदा जिल्ह्यात ही दुर्देवी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बोटीत 35 ते 40 प्रवासी होते. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिक आणि बचावकार्याच्या मदतीने प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. 

यमुना नदीतून प्रवासी बोट फतेहपुर ते मरका अशी येत होती. यावेळी अचानक बोट उलटली. अपघातानंतर एकच आरडाओरडा सुरु झाला. प्रवासी जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. स्थानिक नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी पोलिसांनी कळवलं. स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

मुख्यमंत्र्यांनी दिले मदतीचे निर्देश
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी जिल्हा प्रशासनाला तात्काळ मदत आणि बचावकार्याचे आदेश दिले. झालेल्या घटनेबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, डीआईजी, एनडीआरएफ आणि एसडीआरएफला तातडीने घटनास्थळी पोहचण्याचे निर्देश दिले आहेत.