नवी दिल्ली : पर्यावरणपूरक कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) ची व्यापकता वाढविण्यात येत आहे. यासाठी देशात आणखी ४२ सीएनजी ( CNG stations) आणि टोरेंट गॅसचे तीन सिटी गेट स्टेशन्सचे लोकार्पण करण्यात आले आहे. यात महाराष्ट्राच्या वाट्याला ८ सीएनजी स्टेशन्स आली आहेत.
केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक गॅस व पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आयोजित कार्यक्रमात व्हीडिओ कॉन्फरन्सींगद्वारे सर्व ४२ सीएनजी आणि ३ सिटी गेट स्टेशन्स जोडली. या कार्यक्रमात मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि देशभरातील वितरक ज्यांना सीएनजी आणि सिटी गॅस स्टेशन प्राप्त झालेली आहेत ते उपस्थित होते.
सात राज्य, १ केंद्र शासित प्रदेशातील एकूण ३२ जिल्ह्यांमध्ये टोरेंट गॅसला सिटी गॅस वितरण नेटवर्क उभरण्यात येणार आहेत. पर्यावरणपूरक कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) ची व्यापकता वाढविण्याच्या उद्देशाने देशभर ४२ सीएनजी आणि टोरेंट गॅसचे ३ सिटी गेट स्टेशन्सचे लोकार्पण करण्यात आले. यापैकी ८ महाराष्ट्रामध्ये आहेत.
आज जोडलेल्या ४२ सीएनजी स्टेशन्समध्ये १४ उत्तरप्रदेश, ८ महाराष्ट्र, ६ गुजरात, ४ पंजाब आणि ५-५ तेलंगाणा आणि राजस्थान येथे आहेत. सात राज्य, १ केंद्र शासित प्रदेशातील एकूण ३२ जिल्ह्यांमध्ये टोरेंट गॅसला सिटी गॅस वितरण नेटवर्क उभरण्याचे अधिकार असणार आहेत. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पंजाब मध्ये एक-एक सिटी स्टेशन आहे.