नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आपण कायमच राजकारण किंवा तत्सम वर्तुळात वावरताना पाहिलं आहे. आज हा कार्यक्रम, उद्या ती सभा, परवा कोणा नेत्याची भेट असंचच त्यांचं एकंदर वेळापत्रक. देशाच्या राजकारणात सध्या बरंच चर्चेच असणारं नाव म्हणजे अमित शाह.
राजकारणाव्यतिरिक्त कोणत्या गोष्टीत ते रमले असं फार क्वचितच पाहायला मिळालं. नुकतंच शाह यांनी आयपीएलच्या अंतिम सामन्याला हजेरी लावत क्रिकेटचा आनंद घेतला होता. यावेळी पत्नी सोनलही त्यांच्यासोबत होत्या. (union home minister amit shah went to see a movie prithviraj with wife sonal)
क्रिकेट सामन्यानंतर आता शाह यांनी थेट चित्रपटगृहच गाठलं. यावेळीसुद्धा पत्नी त्यांच्यासोबत दिसली. नवी दिल्ली येथे 'पृथ्वीराज' या चित्रपटाच्या खास स्क्रीनिंगच्या वेळी शाह यांनी हजेरी लावली.
चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी कलाकार आणि कथानकाची प्रशंसाही केली. वास्तवात चित्रपटांमध्ये महिलांचा आदर आणि भारतीय संस्कृती हे घटक अधोरेखित करण्यात आले आहेत.
#WATCH This film depicts Indian culture of respecting women & empowering women. A cultural awakening started in India in 2014, and it will again take India to the heights it was once at : Union Home Minister Amit Shah at a special screening of the film Samrat Prithviraj in Delhi pic.twitter.com/TmKZZDHYoa
— ANI (@ANI) June 1, 2022
चित्रपटाच्या स्क्रिनिंगनंतर ज्यावेळा शाह त्या ठिकाणहून निघत होते तेव्हाच तिथं त्यांची पत्नीही उभी होती. यावेळी चित्रपटातील पात्रांप्रमाणेच त्यांनी पत्नीला ‘चलिये हुकुम’ म्हणत हाक मारली. तेव्हा तिथं असणाऱ्या सर्वांनाच शाह यांचा हा अंदाज पाहून हसू आलं आणि त्यांच्या पत्नी मात्र लाजल्या. धकाधकीच्या या जीवनात शाह आणि त्यांच्या पत्नीच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद सर्वांची मनं जिंकून गेला.