युजीसी नेट परिक्षा : ८ जुलैला परिक्षा, असा करा अर्ज

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) ८ जुलै ला विश्वविद्यालय अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे आयोजन करत आहे.

Updated: Feb 13, 2018, 04:01 PM IST
युजीसी नेट परिक्षा : ८ जुलैला परिक्षा, असा करा अर्ज  title=

नवी दिली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) ८ जुलै ला विश्वविद्यालय अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे आयोजन करत आहे.

यानुसार ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी वयाची मर्यादा २ वर्षांनी वाढविण्यात आली आहे. 

इथे मिळेल माहिती 

यूजीसीनेसाठी ६ मार्चपासून ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरू शकता. ५ एप्रिल पर्यंत तुम्ही अर्ज करु शकता. ६ एप्रिलपर्यंत पैसे भरता येऊ शकतील. 

http://cbsenet.nic.in  या वेबसाईटवर युजीसी-नेट परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती मिळू शकते. अर्ज करण्यासाठीही याच वेबसाईटवर माहीती मिळू शकते. 

यूजीसी नेटच्या निर्देशानुसार ज्यूनियर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) साठीचे सध्याचे २८ वय वाढवून ३० वर्ष करण्यात आले आहे. 

३ ऐवजी २ पेपर 

 सहाय्यक प्राध्यापक आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिप  पात्रतेसाठी परीक्षेत २ पेपर असणार आहेत. यामध्ये पहिला १०० तर दुसरा २०० मार्कांचा असेल. 

दोनदा परिक्षा 

 नेट परिक्षा वर्षामध्ये दोनदा होते. सीबीएसईने पहिल्या वर्षासाठी एकच परीक्षा घेतली होती. पण विद्यार्थी आणि संघटनेच्या विरोधानंतर २०१७ पासून पुन्हा दोनदा परीक्षा सुरू झाली.

२०१७ मध्ये यूजीसी नेट परिक्षा नोव्हेंबरमध्ये झाली होती.