Aadhaar Card : मोफत रेशन घेणार्‍यांसाठी महत्वाची बातमी, 'या' निर्णयाचा थेट फायदा करोडो लोकांना होणार

UIDAI Latest Update : देशभरात केंद्र आणि राज्य सरकारकडून मोफत रेशन आणि स्वस्त रेशनची सुविधा दिली जाते. पण आता UIDAI ने देशातील करोडो लोकांना एक मोठी भेट दिली आहे. तुम्हीही मोफत रेशनचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

Updated: Oct 25, 2022, 09:59 AM IST
Aadhaar Card : मोफत रेशन घेणार्‍यांसाठी महत्वाची बातमी, 'या' निर्णयाचा थेट फायदा करोडो लोकांना होणार title=

Free Ration card : गरिबांच्या हितासाठी देशभरात केंद्र आणि राज्य सरकारकडून मोफत रेशन (free ration) आणि स्वस्त रेशनची सुविधा दिली जाते. पण आता UIDAI ने देशातील करोडो लोकांना एक मोठी भेट दिली आहे. तुम्हीही मोफत रेशनचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. देशातील आधार (Aadhar Crad) जारी करणारी संस्था UIDAI ने म्हटले आहे, आता देशभरात आधार कार्डवर रेशन घेणे शक्य होणार असल्याची माहिती UIDAI ने टिट्वर दिली आहे. (Uidai free ration with aadhaar card under one nation one card scheme)

UIDAI ने केले ट्विट

UIDAI ने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये लिहिले आहे की, आता तुम्ही आधारद्वारे संपूर्ण देशात कुठेही रेशन घेऊ शकता. परंतु यासाठी तुमचे आधार अपडेट करणे आवश्यक आहे. वन नेशन वन आधारद्वारे (one nation one aadhar) तुम्ही आधार कार्डवरून देशभरात रेशन घेऊ शकता.

जवळच्या आधार केंद्रावर संपर्क साधा

तुमचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या आधार केंद्राशी संपर्क साधू शकता. याशिवाय, अधिकृत वेबसाइट https://bhuvan.nrsc.gov.in/aadhaar/ द्वारे देखील आधार केंद्र शोधता येईल.

वाचा : 'या' शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल महागले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

तुम्ही टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधू शकता

आजच्या काळात तुम्ही तुमच्या घरातील कामापासून ते बँकेपर्यंतची सर्व कामे आधारद्वारे करता, त्यामुळे ते अपडेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला आधारशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास, तुम्ही टोल फ्री क्रमांक 1947 वर देखील संपर्क साधू शकता. येथे तुम्हाला आधारशी संबंधित सर्व माहिती मिळेल.