दोन महिन्यात एकाच कुटुंबातील दोन मुलं शहीद; हळहळ व्यक्त करत वडील म्हणाले...

नेगी कुटुंबाने 2 महिन्यात गमावले 2 सुपुत्र.. कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 10, 2024, 05:24 PM IST
दोन महिन्यात एकाच कुटुंबातील दोन मुलं शहीद; हळहळ व्यक्त करत वडील म्हणाले...  title=

अलीकडेच जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला केला होता. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे 5 जवान शहीद झाले असून अंदाजे तेवढेच जवान जखमी झाले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की शहीद झालेले पाचही जवान उत्तराखंडमधील आहेत. या हौतात्म्याचा राज्याला अभिमान वाटत असतानाच जवानांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. एक कुटुंब आहे ज्यांचे दोन पुत्र दोन महिन्यांच्या कालावधीत देशासाठी शहीद झाले आहेत. 

एकाच कुटुंबातील दोन मुले शहीद

उत्तराखंडमधील टिहरी येथील डागर गावातील एका कुटुंबातील दोन मुले दोन महिन्यांच्या कालावधीत देशासाठी शहीद झाली आहेत. यातील एका मुलाचा, आदर्श नेगीचा गेल्या सोमवारी जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे मृत्यू झाला. तर दुसरा मुलगा आणि आदर्शचा चुलत भाऊ मेजर प्रणय नेगी गेल्या एप्रिलमध्ये लेहमध्ये आजाराशी लढताना शहीद झाला. दोन्ही मुलांच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

लग्नाची होती चर्चा 

कठुआमध्ये शहीद झालेला जवान आदर्श नेगी 2018 साली गढवाल रायफल्समध्ये रुजू झाला होता. त्यांचे वडील शेतकरी होते. मिळालेल्या माहितीनुसार, आदर्शच्या आई-वडिलांचीही लग्नासाठी बोलणी सुरू होती. मात्र एका मुलाच्या हौतात्म्यातून कुटुंब सावरले होते, तेव्हा दुसरा मुलगाही शहीद झाला होता. स्थानिक आमदार, राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी शहीदांचे वडील आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे.

वडिलांची प्रतिक्रिया 

रायफलमॅनचे काका बलवंत सिंह नेगी म्हणाले की,'आता दोन महिन्यांपूर्वी आम्ही एक मुलगा गमावला. देशाची सेवा करताना तो शहीद झाला. तो मेजर पदावर होतो. आता जम्मू काश्मिरमध्ये केलेल्या दहशतवागी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. जेथे आदर्शसह पाच जवान शहीद झाले.'

सीएम धामी यांनी श्रद्धांजली वाहिली

मंगळवारी संध्याकाळी पाच शहीद जवानांचे पार्थिव लष्करी विमानाने डेहराडून विमानतळावर पोहोचले. राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. सीएम धामी म्हणाले की, देशाचे रक्षण करताना सर्व देशवासीय आपल्या अमर हुतात्म्यांना त्यांच्या स्मृतींमध्ये नेहमी जिवंत ठेवतील. तुम्ही लष्करी भूमी उत्तराखंडची शान आहात आणि राज्यातील सर्व जनतेला तुमचा अभिमान आहे.