नवी दिल्ली : राजकीय नेते, सेलिब्रेटींच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्सच्या संख्येवरुन त्यांची लोकप्रियता ठरविली जाते. पण ही लोकप्रियता फुगवून, ओढवून दाखविल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. आता या यादीमध्ये दिग्गज नेत्यांची नावे समोर आली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांनी सॉफ्टवेअरच्या मदतीने कृत्रिमरित्या फॉलोअरची संख्या वाढवल्याचे समोर आले आहे. दोन महिन्यांपूर्वीच्या माहितीच्या आधारे हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदींचे ४५ टक्के आणि राहुल गांधी यांचे ४९ टक्के फॉलोअर बोगस आहेत असे ट्विटर कंपनीने स्वतःच्या ऑडिट रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. मोदींच्या एकूण फॉलोअरपैकी १ कोटी ८२ लाख ९५ हजार खरे आणि १ कोटी ४४ लाख ९१ हजार ८८४ फॉलोअर बोगस आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांना ट्विटरवर फॉलो करणाऱ्यांमध्ये बोगस मंडळींची संख्या खूपच जास्त आहे. दोन्ही नेत्यांसाठी काम करणाऱ्या आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांनी सॉफ्टवेअरच्या मदतीने कृत्रिमरित्या फॉलोअरची संख्या वाढवली आहे. तसेच अनेक बनावट खाती तयार करुन फक्त फॉलोअरची संख्या वाढवण्यासाठी त्यांचा उपयोग करण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे ६४ टक्के फॉलोअर्स बोगस आहेत.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे ७३ टक्के फॉलोअर्स बोगस आहेत.
भाजपचे ७१ टक्के फॉलोअर्स बोगस आहेत.
काँग्रेस पक्षाचे ६९ टक्के फॉलोअर्स बोगस आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे केवळ २२ टक्के फॉलोअर्स खरे आहेत.