100 पैकी 100 गुण मिळवूनही जुळे भाऊ देणार JEE पुन्हा परिक्षा

शिक्षणाची प्रचंड आवड 

Updated: Jan 21, 2020, 01:25 PM IST
 100 पैकी 100 गुण मिळवूनही जुळे भाऊ देणार JEE पुन्हा परिक्षा title=

मुंबई : वाचायला आश्चर्य वाटेल पण काही विद्यार्थ्यांना खरंच अभ्यास करायला प्रचंड आवडतो. हे विद्यार्थी फक्त पास होण्यासाठी किंवा आपल्या पालकांना खूश करण्यासाठी चांगला अभ्यास करत नाहीत तर खरंच मनापासून त्यांना अभ्यास करायला आवडतो. 

हे अभ्यासाचं पॅशन जुळ्या भावांमध्ये पाहायला मिळालं आहे. निशांत आणि प्रणव अग्रवाल अशी या जुळ्या भावांची नावे. या दोघांनी जेईई म्हणजे Joint Entrance Examination परिक्षेत टॉप केलं आहे. यामध्ये प्रणवला 100 पैकी 99.93 टक्के मिळाले आहेत तर निशांतला 100 पैकी 100 टक्के मिळाले आहेत. निशांत दिल्लीतील टॉपरपैकी नववा टॉपर आहे.  99.93 टक्के मिळूनही प्रणव पुन्हा एकदा एप्रिलमध्ये जेईईची परिक्षा देणार आहे. एवढंच नाही तर देशात सर्वाधिक गुण मिळवणारा निशांतही एप्रिलमध्ये पुन्हा परिक्षा देणा आहे. 

17 वर्षांचे हे दोघे जुळे भाऊ दिवसातून 10-12 तास एकत्र अभ्यास करायचे. ते दोघं एकमेकांना अभ्यासात भरपूर मदत करायचे इतकंच नाही तर एकमेकांना प्रोत्साहित देखील करायचे. आपल्या जुळ्या भावाला निशांतला 100 टक्के गुण मिळाल्यामुळे प्रणव आनंदीत आहे. याला त्याला चांगलीच प्रेरणा मिळाली आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा जेईईची परिक्षा देणार आहे. एवढंच नव्हे तर निशांत देखील प्रणवसोबत परिक्षा देणार आहे. 

निशिकांत आणि प्रणव हे दोघेही लहानपणापासूनच खूप हुशार आणि अभ्यासू आहेत. त्यांना जेईईमध्ये चांगले मार्क मिळवून दिल्ली किंवा मुंबई आयआयटीमध्ये शिक्षण घ्यायचे आहे. प्रणवला कॉम्प्युटर सायन्समध्ये जायचंय तर निशांतने अद्याप काय करायचं ते ठरवलं नाही.