धक्कादायक! रस्ते अपघतात जुळ्या बहिणींचा जागीच मृत्यू

न्यायाधीश वडिलांनी मुलांसाठी पाहिली होती वेगळी स्वप्न 

Updated: Oct 28, 2021, 12:23 PM IST
धक्कादायक! रस्ते अपघतात जुळ्या बहिणींचा जागीच मृत्यू  title=

मुंबई : सोमवारी रात्री अमृतसर चंदीगड महामार्गावरील लाईट पॉईंटवर जबरदस्त अपघात झाला. हा अपघात इतका भीषण आहे की, यामध्ये जुळ्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. लाईट पॉईंटवर उभ्या असलेल्या कारला भरधाव ट्रॉलीने धडक दिली. या अपघातात कारमधील दोन बहिणींचा मृत्यू झाला, तर एअरबॅग उघडल्यामुळे तीन व्यक्तींचा जीव बचावला आहे. दोघी बहिणींचा मात्र यामध्ये मृत्यू झाला आहे. रियासी जिल्ह्यात न्यायदंडाधिकारी म्हणून नियुक्त सय्यद अदनान यांच्या मुली होत्या.  मंगळवारी त्या दोघींच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुंछ येथील रहिवासी अदनान सायंत यांची मोठी मुलगी जावा हिची सोमवारी चंदीगडमध्ये एमबीबीएस प्रवेश परीक्षा होती.लहान बहीण अक्सानेही मोठ्या बहिणीसोबत जाण्याचा हट्ट धरला होता. वडील सय्यद यांनी कारमध्ये एकटीने जाण्यास नकार दिला होता. जम्मूमध्ये राहणाऱ्या एका मित्राचा फोन आला की तो त्याच्या बहिणी आणि भावासोबत चंदीगडला जाणार आहे. हवं तर त्यांच्यासोबत फिरता येईल. यामुळे सय्यद यांनी परवानगी दिली. परीक्षा देऊन संध्याकाळी परतत असताना हा जबर अपघात झाला.

अपघाताच्यावेळी मैत्रिणीचा भाऊ गाडी चालवत असताना मैत्रिणी पुढच्या सीटवर बसली होती. तर या दोन बहिणी मागे बसल्या होत्या. अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर मृतदेह त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले. पूंछमधील सुरनकोट परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले. न्यायाधीश नॅशनल कॉन्फरन्सचे नेते काझी सय्यद यांचा मुलगा आहे. त्यांची पत्नी पुंछमधील एनसी नेते एजाज जान यांची बहीण आहे. 

मुलींचे न्यायाधीश वडील त्यांना पुढील अभ्यासासाठी पाठवण्याच्या तयारीत होते. मात्र नशिबाने वेगळाच निर्णय घेतला. झावा अदनान आणि अक्सा अदनान अशी या दोन बहिणींची नावे आहेत