Turmeric Farming Business Idea | कमी खर्चात चार पट नफा देईल हे पीक; मागणीत कधीच कमी नाही

 जर तुम्ही हळदीची शेती करत असाल तर तुम्हाला चांगला नफा होऊ शकतो. हे पीक 7-8 महिन्यात तयार होते

Updated: Aug 8, 2021, 01:10 PM IST
Turmeric Farming Business Idea | कमी खर्चात चार पट नफा देईल हे पीक; मागणीत कधीच कमी नाही title=

यवतमाळ : जर तुम्ही हळदीची शेती करत असाल तर तुम्हाला चांगला नफा होऊ शकतो. हे पीक 7-8 महिन्यात तयार होते. एका हेक्टरवर तुमचा खर्च साधारण 1 लाख रुपयांपर्यंत येतो. पीक आल्यानंतर साधारण 3-4 लाखापर्यंत नफा मिळू शकतो.

जर तुम्ही चांगली कमाई करू इच्छिता तर हळदीची शेती एक चांगला पर्याय आहे. हळदीच्या शेतीमुळे तुम्हाला 4 लाख रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. हळदीचा वापर प्रत्येक घरात होतो. त्यामुळे त्याची मागणी कमी होण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच हळदीचा वापर औषधं बनवण्यासाठीही होतो. त्यामुळे हळदीची शेती फायद्याची ठरू शकते. जाणून घेऊया त्याविषयी...

कधी आणि कशी केली जाते हळदीची शेती?
हळदीची शेती मे-जूनच्या दरम्यान केली जाते.ज्या परिसरामध्ये सिंचनाची चांगली सुविधा नसते. तेथे मान्सूनच्या सुरूवातीला जुलैच्या दरम्यान हळदीची शेती केली जाते. तुमच्या शेतात सिंचनाची सोय असेल तर, ऑगस्टच्या मध्यापर्यंतदेखील लागवड करताय येऊ शकते. हळदीच्या छोट्या छोट्या अंकुरित तुकड्यांना जमिनीत लावून दोन्ही बाजून माती चढवली जाते. त्यांनंतर 6-8 महिन्यांमध्ये हळदीचे पीक तयार होते.

हळदीचा उत्पानद खर्च
हळद लागवडीसाठी एक एकरासाठी साधारण 20 क्विंटल अंकुरित तुकड्यांची गरज असते. त्यासाठी 25  रुपये प्रति किलो खर्च येतो. यासाठी 40 हजार रुपयांचा खर्च येईल. याशिवाय खते, एनपीके, डीएपी आणि मजूरी धरून साधारण 1 लाख रुपये प्रति हेक्टर खर्च येऊ शकतो. हळदीचे उत्पादन आल्यावर तिला उकळून सुखवावी लागते. यानंतर तिचे वजन 50-60 रुपये क्विंटल इतके असल्यास, बाजारात 80 रुपये किलोप्रमाणे 4-5 लाखापर्यंत उत्पन्न मिळेल. खर्च वगळून 3 ते 4 लाख रुपयांपर्यंत नफा 7-8 महिन्यांत होऊ शकतो.