प्रायव्हेट पार्टमधील रक्तासाठी ट्यूशन टीचरने..., तांत्रिकाचं ऐकून जे केलं त्याने सर्वांनाच बसला धक्का!

हृदयद्रावक घटना! तांत्रिकाने लावला मुलीच्या रक्तामध्ये माखलेला कपडा आणायला लावला त्यानंतर...

Updated: Nov 1, 2022, 05:51 PM IST
प्रायव्हेट पार्टमधील रक्तासाठी ट्यूशन टीचरने..., तांत्रिकाचं ऐकून जे केलं त्याने सर्वांनाच बसला धक्का! title=

Crime News : विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी समाजातील लोक अजुनही अंधश्रद्धांवर विश्वास ठेवत असल्याचं दिसत आहे. एक धक्कादायक घटना समोर आली असून ट्यूशन टीचरने माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं आहे. आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. 

नक्की काय आहे प्रकरण?
पश्चिम बंगालमधील बांकुरा जिल्ह्यातील बिष्णुपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात आरोपी शिक्षक राहत होता. 37 वर्षीय शिक्षक गावामध्ये शिकवणी घेत होता, त्याचं लग्न झालं नव्हतं. वाढत्या वयामुळे तो टेन्शनमध्ये असायचा. लग्नात येणाऱ्या अडथळ्यासाठी त्याने नको त्या मार्गाला जायचं ठरवलं. आरोपी शिक्षकाने एका तांत्रिकाशी संपर्क साधला त्यावेळी तांत्रिकाने अघोरी कृत्य करायला सांगितलं. 

तांत्रिकाने शिक्षकाला एका अल्पवयीन मुलीचं गुप्तांगामधील रक्ताने माखलेलं कापड आणायला सांगितलं. जर हे करण्यात यशस्वी ठरलात तर तुझ्या लग्नात येणारा अडथळा दूर होऊ शकतो, असं तांत्रिकाने सांगितलं. त्यानंतर या नराधमाने तो शिकवत असलेल्या शिकवणीमधील दुसरीत शिकणाऱ्या आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर त्याने बलात्कार केला. 

तांत्रिकाने सांगितल्यानुसार, आरोपी शिक्षकाने रक्ताने माखलेला कपडा तांत्रिकाकडे नेला. बलात्कारानंतर मुलगी रक्ताच्या थारोळ्यात  पडलेली होती त्यानंतर ती रडत रडत घरी जाते. तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार घरच्यांना सांगते, चिमुकलीने सांगितलेला थरार ऐकून  कुटुंबीयांच्या पायाखालची वाळू सरकते.  

मुलीला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करतात. त्यानंतर कुटुंबियांनी आरोपी शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. तत्परता दाखवत पोलीस शिक्षकाला पकडतात त्याची कसून चौकशी करतात. या चौकशीदरम्यान शिक्षक गुन्हा कबूल करतो आणि तांत्रिकाच्या सांगण्यावरून हे सर्व केल्याचं सांगतो. पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.