काँग्रेसला 'वगळण्यास' ममता बॅनर्जींचा नकार

निवडणुक आयोगात पक्षाचे नाव अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस म्हणून नोंदण्यात आले आहे.

Updated: Mar 24, 2019, 12:32 PM IST
काँग्रेसला 'वगळण्यास' ममता बॅनर्जींचा नकार title=

बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॉनर्जी यांनी त्यांच्या पक्षाच्या नावामधून काँग्रेस शब्द वगळल्याच्या चर्चांना उधान आले आहे. पण ममता बानर्जी यांनी शनिवारी जारी केलेल्या निवडणुक आयोगात पक्षाचे नाव अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस असल्याचे सांगत सर्व चर्चंना पूर्ण विराम दिला आहे. 

निवडणुक आयोगात पक्षाचे नाव अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस म्हणून नोंदण्यात आले आहे. पक्षाचे नाव आणि  निवडणूक चिन्ह (फूल आणि गवत) यांना निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 1998 रोजी मान्यता दिली आहे.

अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसने, काँग्रेस हा शब्द त्यांच्या पक्षाच्या चिन्हातून आणि पोस्टर मधून वगळून फक्त तृणमूल ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अनेक माध्यमांकडून सांगण्यात आले होते. अखिल भारतीय काँग्रसची स्थापना 1 जानेवारी 1998 साली करण्यात आली होती.