मुंबई : कठीण प्रसंगी माणसालच माणूसच उपयोगी पडतो असे आपण म्हणतो. परंतु किती झालं तरी माणूसच तो, त्याच्या स्वभाव आणि विचार कधी आणि कसे बदलतील, याचा काही नेम नाही. त्यामुळे हाच माणूस कधी इतकी असंवेदनशील होतो की, ते पाहून तुम्हाला शब्दच फुटणार नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एक ट्रक आडवा पडला आणि त्यामुळे गोणीतून भरुन लोक काही तरी घेऊन जात आहेत.
खरंतर एका ट्रकचा अपघात झाला आहे. हा ट्रक पातं भरुन हरभऱ्याचं धान्य वाहून नेत होतं. परंतु त्याचा आपघात झाल्यामुळे तो ट्रक खाली आडवा पडला आहे. याच परिस्थीतीचा फायदा घेऊन तेथील उपस्थीत लोक या ट्रकमधील पोतं उचलून घेऊन जात आहेत.
हे संपूर्ण प्रकरण छत्तीसगडमधील बिलासपूर येथील आहे. शहरातील रस्त्याच्या मधोमध हरभऱ्याच्या पोत्याने भरलेल्या ट्रकचा अपघात झाला. या अपघातात ट्रकचा चालक जखमी झाला. परंतु, अपघातात जखमी झालेल्या ट्रकच्या चालकाला मदत करण्याऐवजी काही असंवेदनशील लोकांनी ट्रकमध्ये भरलेल्या हरभऱ्याच्या पोत्याची लूट सुरू केली.
मात्र, तेथे काही चांगले ही लोक होते, ज्यांनी त्या चालकाला मदत करून तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र बाकीचे लोक या संधीचा फायदा घेत हरभऱ्याची पोती लुटून आपल्या घरी नेण्यात व्यस्त होते. एवढेच नाही तर आजूबाजूच्या लोकांना याची माहिती मिळताच ते पोते लुटण्यासाठी पोहोचले.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अपघात झालेल्या ट्रकवर काही लोक चढून हरभऱ्याची पोती खाली फेकत आहेत. तिथे उभे असलेले लोक त्या पोत्या घेऊन जात आहेत.
#WATCH | Chhattisgarh | People stole gram (Chana) sacks from a truck after it met with an accident with another truck in Bilaspur pic.twitter.com/VM3w8kV3Xb
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) May 27, 2022
ट्रकमध्ये सुमारे 982 पोती हरभरा भरल्याची माहिती समोर आली आहे. त्यांपैकी अर्ध्याहून जास्त पोतं चोरीला गेलं आहे.
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ उपस्थीत असलेल्या लोकांपैकी कोणीतरी आपल्या कॅमेरात कैद केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला, त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.