Tripura Rath Accident: त्रिपुरात जगन्नाथ रथ यात्रेत भीषण दुर्घटना, वीजेच्या धक्क्याने 6 जणांचा मृत्यू, 15 जखमी

त्रिपुरात एक भीषण दुर्घटना घडली आहे. उच्च वीज दाब असलेल्या तारेच्या संपर्कात आल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर या दुर्घटनेत 15 जण जखमी झाले आहेत. अचानक घडलेल्या या घटनेने यात्रेत एकच धावपळ उडाली. 

राजीव कासले | Updated: Jun 28, 2023, 09:51 PM IST
Tripura Rath Accident: त्रिपुरात जगन्नाथ रथ यात्रेत भीषण दुर्घटना, वीजेच्या धक्क्याने 6 जणांचा मृत्यू, 15 जखमी title=

Tripura Rath Accident: त्रिपुरातल्या कुमारघाट इथं भगवान जगन्नाथ रथ यात्रेदरम्यान (Jagannath Rath Yatra) मोठी दुर्घटना (Accident) घडली. मिरवणूक सुरु असताना रथ एका उच्च दाबाच्या वीज तारेच्या ( High Tension Wire) संपर्कात आला. यामुळे करंट पसरला आणि त्याच्या धक्क्याने सहा जणांचा (6 Dead) जागीच मृत्यू झाला. तर पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत. अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

काय घडलं नेमकं?
अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना त्रिपुरातील (Tripura) उनाकोटी जिल्ह्यातील कुमारघाट इथं संध्यासाठी साडेचारच्या दरम्यान घडली. कुमारघाट इथं भगवान जगन्नाथाची रथ यात्रा उत्सव साजरा केला जात होता. यात भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ यांची रथ यात्रा मोठ्या उत्सहाता काढण्यात आली होती. लोखंडाने बनलेला हा रथ हाजोर भाविक आपल्या हाताने खेचत नेत होती. याचदरम्यान, लोखंडाचा हा रथ रस्त्यातील हाय टेन्शन वायरच्या संपर्कात आला. यामुळे वीज रथात उतरली आणि अनेक जणांना वीजेचा धक्का बसला. यात सहा भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर पंधरा जण होरपळले. 

लोकांच्या शरीराला लागली आग
विजेचा धक्का इतका तीव्र होता की ज्या भाविकांना वीजेचा धक्का बसला, त्यांच्या शरीलाला अक्षरश: आग लागली. ही घटना इतकी भीषण होती की यात्रेतील इतर लोकं त्यांना मदतही करु शकत नव्हती. घटनेची माहिती तात्काळ पोलीस आणि फायर ब्रिगेडला देण्यात आली. होरपळलेल्या पंधरा जणांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वीजेच्या संपर्कात आलेली लोकं रस्त्यावर अक्षरशा किंचाळत होती. त्यांच्या शरीराने पेट घेतला होता.

133 केवी ओवरहेड केबल
पोलिसांनी दिले्लया माहितीनुसार रथ 133 केवी ओव्हरहेड केबलच्या संपर्कात आला. वीजेचा हा प्रवाह इतका तीव्र होता की लोखंडाचा रथ केबलच्या संपर्कात येताच, रथाला हात लावलेल्या लोकांना क्षणार्थात त्याचा धक्का बसला. जगन्नाथ यात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते. दुर्घटना घडताच एकच पळापळ झाली. पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. पीडित कुटुंबांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचा शोकसंदेश त्यांनी दिला आहे. जखमींवर योग्य उपचार करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.