VIDEO : 'ती' स्टेजवर शॉर्ट ड्रेस घालून बोल्ड डान्स करत होती अन् मग...

Viral Video :   शॉर्ट ड्रेसमध्ये एक तरुणी स्टेजवर येते...समोर असंख्य पाहुणे बसले आहे. डीजेचा आवाज वाजायला लागतो तरुणी बोल्ट आणि जबरदस्त डान्स करायला सुरुवात करते आणि मग...पुढे काय होतं हा पाहा धक्कादायक व्हिडीओ...

Updated: Jan 16, 2023, 01:02 PM IST
VIDEO :  'ती' स्टेजवर शॉर्ट ड्रेस घालून बोल्ड डान्स करत होती अन् मग... title=
Trending video Short Dress girl dancing bold hot viral on Social media

Trending Video : आजकाल सोशल मीडियावर (Social media) प्रत्येक जण रोजच्या जीवनातील घडामोडीचे अपडेट देत असतात. कधी काही लिहून, तर कधी कुठला फोटो ठेवून तर कधी व्हिडीओ शेअर करुन ते नेटकऱ्यांना आपल्या आयुष्यातील क्षण सांगत असतात. या सोशल मीडियामुळे आज प्रत्येकाच्या आयुष्यात काय सुरु आहे हे अख्खा जगाला कळतं. माझं आयुष्य किती छान आहे, मी काय काय करते अगदी माझ्या आयुष्यात किती दु:ख आहे हे देखील आपण या प्लॅटफॉर्मवर सहज सांगतो. खाजगी असं काही राहिलं नाही आहे. अशातच एका तरुणीचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर यूजर्सचं लक्ष वेधून घेतं आहे. 

शॉर्ट ड्रेस घालून ती स्टेजवर आली...

डीजेचा (DJ) आवाज आला की आपोआप आपले पाय थिरकायला लागतात. या व्हिडीओमध्येही एका तरुणीचा डान्स कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ (dance video)  एका कार्यक्रमातील दिसतं आहे. या कार्यक्रमातील स्टेजवर एक तरुणी छान शॉर्ट ड्रेस घालून येते. डीजेवर 'याद पिया की आने लगी...' हे लोकप्रिय गाणं वाजायला लागतं.  तरुणी थिकरायला लागते.  पण पुढच्या क्षणी तिच्यासोबत काय घडणार याचा तिने कधी विचारही केला नसेल. तिचा स्टेप्स पाहून उपस्थित पाहुणे घायाळ होतात. डान्स रंगात येणार तोच ती तरुणी स्टेजवर तोंडावर आपटते. (Trending video Short Dress girl dancing bold hot viral on Social media)

व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता स्टेजवर पाणी पडलं आहे. त्यामुळे डान्स करताना त्या तरुणीचा पाय घसरला. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर thejusticmemes नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर केल्यापासून आतापर्यंत त्याला 5 हजारहून अधिक लाईक मिळाले आहेत. दरम्यान त्या तरुणीला जोरदार लागलं असणार.