VIDEO : Hug आणि Kiss करत चालत्या बाइकवर जोडप्याचा रोमान्स, अजून एक धक्कादायक प्रकार समोर

Couple Romance on Bike : भररस्त्यात धावत्या स्कूटीवर प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अजून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

Updated: Jan 22, 2023, 09:18 AM IST
VIDEO : Hug आणि Kiss करत चालत्या बाइकवर जोडप्याचा रोमान्स, अजून एक धक्कादायक प्रकार समोर  title=
Trending Video Shocking chhattisgarh couple hugging kissing on moving bike Viral on Social media marathi news

Couple Romantic Viral Videos : आजच्या तरुण पिढीने सगळीच लाज सोडली आहे का असाच प्रश्न पडला आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील (Lukhnow) मध्ये स्टूटीवर अश्लिल चाळे (Romance Video) करताना व्हिडीओ समोर आल्यानंतर अजून एक धक्कादायक व्हिडीओ  (video viral on social media) समोर आला आहे. ज्या गोष्टी चार भिंतीत केल्या जात होत्या त्या आता दिवसाढवळा रस्त्यावर केल्या जात आहेत. हे अशाप्रकारे कृत्य समाजात आक्षेपार्ह आहे. शिवाय रस्त्यावर अशा गोष्टी करणे म्हणजे वाहतुक नियमाचं उल्लंघनदेखील आहे. 

प्रेमी युगुलाचे बाइकवर अश्लिल चाळे 

भर दिवसा रस्त्यावर धावत्या बाइकवर रोमान्स करताना एक जोडप कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता काळा रंगाच्या बाइकवर कपलदेखील काळ्या रंगाच्या पोशाखात बाइकवरुन जातं आहेत. तरुणी बाइकच्या पेट्रोल टाकीवर बसून तरुणाला मिठी मारुन बसली होती. ती तरुणी तरुणाचा जॅकेटमध्ये आपला चेहरा लपवून बसली होती. हे जोडप अख्खा शहरात असे फिरत होती. अधून मधून ती तरुणी त्या तरुणाला किस करत होती. या प्रेमी युगुलाचे चाळे रस्त्यावरुन जाणारे आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होते. (Trending Video Shocking chhattisgarh couple hugging kissing on moving bike Viral on Social media  marathi news)

कुठला आहे हा व्हायरल व्हिडीओ 

 हा व्हिडीओ छत्तीगडमधील आहे. भिलाई जयंती स्टेडियमच्या मागून एक हायस्पीड काळ्या रंगाची बाइक आली आणि या बाइकने सर्वांचं लक्ष वेधून घेतं. या बाइकच्या मागे स्कूटरवर मित्र या बाइकचा व्हिडीओ काढताना दिसतं आहे. या बाइकवर हे कपल रोमान्स करताना दिसत आहे. हे जोडपे जयंती स्टेडियम ते स्मृतीनगरपर्यंत रस्त्यावर रोमान्स करताना दिसून आले. त्यानंतर ही बाइक ग्लोब चौकातून सेक्टर 8 च्या उड्डाणपुलावरुन नेहरु नगर भेलवा नगर तलावासमोर थांबले. तिथेही या कपलचं अश्लिल चाळे सुरुच होते. यानंतर हे जोडपे स्मृतीनगरमधील एका रेस्टॉरंटमध्ये गेले. या जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

वाहतूक नियमाची पायमल्ली

दुर्गचे एसपी डॉ. अभिषेक पल्लव यांनी हेल्मेट आणि सीट बेल्ट न लावता कोणी गाडी चालवताना आढळल्यास त्यांचावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र हे जोडपे खुलेआम वाहतूक नियमांची पायमल्ली करताना दिसून आले. या व्हिडीओ पाहून अनेक संतापजनक प्रतिक्रिया येतं आहेत. रस्त्यावर अशाप्रकारे निर्लज्जपणे वागणे केवळ जोडप्यासाठीच घातक नाही तर ते वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन देखील आहे, असं नेटकऱ्यांचं म्हणं आहे.