रस्ता खचल्याचा थरारक व्हिडीओ! दरीत दोन गाड्या कोसळल्या

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. 

Updated: Aug 13, 2022, 11:37 AM IST
रस्ता खचल्याचा थरारक व्हिडीओ! दरीत दोन गाड्या कोसळल्या title=
trending video rain in himachal pradesh kalka shimla national highway 5 collapsed flyover in marathi

Trending Video Flyover collapses :  हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) पावसाने थैमान घातलं आहे. पावसाने हिमाचल प्रदेशातील राज्यामध्ये कहर माजवला आहे. कुल्लू जिल्ह्यात जमीन भूस्खलनामुळे दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक ठिकाणी पावसामुळे आलेल्या पुरामुळे घर आणि दुकानं वाहून गेली. (trending video rain in himachal pradesh kalka shimla national highway 5 collapsed flyover in marathi)

हिमालच प्रदेशातील शिमलाजवळील कालका-शिमला नॅशनल हायवे-5 (Kalka Shimla National Highway 5) वरील फ्लायओव्हरचा काही भाग अचानक कोसळला.  दोन गाड्या या दुर्घटनेच्या शिकार झाला. नशिबाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर हा हायवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता मधोमध रस्ता खचल्यामुळे वाहन पुढे जाऊ शकत नाही. हायवेवरील वाहने हळूहळू मागे सरकत आहे. रस्ता खचल्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली. हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. 

घटनेची माहिती मिळतातच बचावकार्य सुरु झालं. जर या रस्त्यावरून वाहनांचा वेग जोरदार असता तर मोठी दुर्घटना झाली असती.