Delhi Girl Kidnapping Viral Video : सोशल मीडियावर शनिवारी 19 मार्च 2023 ला एक 17 सेकंदच्या या व्हिडीओने देशाची झोप उडवली. रात्रीच्या वेळी भररस्त्यातून एक तरुणी बेदम मारहाण करते तिला फरफटत एका गाडीतून किडनॅप करुन घेऊन जाताना दिसतं आहे. या सगळ्या प्रकार घडत असताना त्या तरुणीच्या मदतीला कोणी आलं नाही, त्यामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
ही धक्कादायक घटना दिल्लीतील असल्याचं समोर आलं. त्यानंतर या व्हायरल व्हिडीओची दखल दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी घेतली. त्यांनी दिल्ली पोलिसांना या व्हिडीओची चौकशी करण्यासाठी नोटीस पाठवली. त्यानंतर या घटनेमागील सत्य समोर आलं आहे. (trending video delhi girl kidnapped assault viral video truth Open Delhi Police investigated shocking in marathi )
पोलीस सूत्रांनुसार, या दिवशी कारमधील तरुणी आणि तरुणींमध्ये जुन्या एका गोष्टीवरून वाद झाला होता. कारमधील वादानंतर जेव्हा गाडी सिग्नलवर पोहोचली ती तरुणी कॅबमधून खाली उतरली. त्यानंतर तरुणी ऐकत नव्हती म्हणून तरुणीने तिला जबरदस्ती गाडी ढकललं आणि गाडीतून घेऊन गेले. पण या दरम्यान रस्त्यावरील इतर लोकांनी या घटनेचा व्हिडीओ बनवला आणि तो काही क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाला.
पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे कॅबचा नंबर शोधला. त्या नंबराच्या आधारे कॅब चालकाचा शोध पोलिसांनी घेतला. ती उबेरची कॅब असल्याने उबेर बुकिंगद्वारे चालकाचा पत्ता लागला. पोलीस त्याचा घरी पोहोचले. त्यावेळी चालकाने सांगितलं की, दिल्लीतील रोहिणीहून दोन तरुण आणि एक तरुणी विकासपुरीला जाण्यासाठी त्याचा कॅबमध्ये चढले.
काही वेळानंतर त्या तिघांमध्ये कुठल्या तरी कारणावरुन वाद झाला. जेव्हा गाडी सिग्नलला थांबली तेव्हा ती रागाच्या भरात कॅबमधून खाली उतरली. तेव्हा कॅबमधील तरुणांनी तिला जबदस्ती पुन्हा गाडीत बसवलं आणि आम्ही निघालो.
महिला को ज़बरन गाड़ी में डालने और पीटने की इस वायरल वीडियो पर संज्ञान लेते हुए मैं दिल्ली पुलिस को नोटिस जारी कर रही हूँ। इन लोगों के ख़िलाफ़ आयोग सख़्त एक्शन सुनिश्चित करेगा। pic.twitter.com/szAww5ykxD
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) March 19, 2023
यानंतर पोलिसांनी पहिल्या तरुणाचा शोध घेतला. त्याचा मदतीने दुसरा तरुणी आणि तरुणीचा शोध घेण्यात आला. मग या तिघांची पोलिसांनी कसून चौकशी केली. तेव्हा सगळं सत्य बाहेर आलं. हे तिघही मैत्र असून ते दिल्लीतील रोहिणी सेक्टर 35 मध्ये राहत होते. या व्हिडीओमागील सत्य शोधल्यावर हे समोर आलं की, त्या तरुणीचं अपहरण झालं नव्हतं.