Viral Video : भर रस्त्यात गाडीच्या छतावरून बसून मारले पेग वर पेग, व्हिडिओ व्हायरल

Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ हे खुप धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एक तरूण गाडीच्या छतावर बसून दारू डोसत असल्याचे दिसत आहे. या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल होत आहे.या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

Updated: Jan 9, 2023, 09:32 PM IST
Viral Video : भर रस्त्यात गाडीच्या छतावरून बसून मारले पेग वर पेग, व्हिडिओ व्हायरल title=

Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ हे खुप धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एक तरूण गाडीच्या छतावर बसून दारू डोसत असल्याचे दिसत आहे. या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल होत आहे.या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

व्हिडिओत काय?

एखाद्या रस्त्यावर ट्राफीक लागला आणि तूमची त्यात गाडी अडकली की खुपच वैताग येतो. कारण गाडीला रस्ता काढायला वेळ लागतो. त्यामुळे ट्राफीकमध्ये नेहमीच कंटाळा येतो. हा कंटाळा दुर करण्यासाठी आणि वेळेचा सदूपयोग करण्यासाठी एक तरूण थेट गाडीच्या छतावर चढला आहे. या छतावर चढून त्याने काय केले असेल हे पाहून तुम्हाला धक्का बसणार आहे.

तरूणाने गाडीच्या छतावर चढून दारूची बॉटल काढून पेग बनवायला सुरुवात केली. हे पेग बनवत असताना गाडी पुढे पुढे सरकत होती. मात्र तो गोंधळला नाही. तो निवांत दारू पिण्याचा आनंद लुटत होता. मात्र त्याला पाहून सर्वजण आरडा ओरड करत होते. या संदर्भातला व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 

हा व्हिडिओ रवी हांडा नावाच्या युजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबतच त्याने कॅप्शनही लिहिले आहे की, हे फक्त गुरुग्राममध्येच शक्य आहे. या व्हिडिओला 30 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. एका यूजरने कमेंट करताना लिहिले की,असे केल्यास तुरुंगवास होऊ शकतो. त्याचवेळी दुसर्‍या यूजरने लिहिले आहे, हा दिल्ली-जयपूर हायवे आहे, तुम्ही गुरुग्रामची बदनामी का करत आहात? असा सवाल त्याने केला आहे. 

दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेमका कोणत्या परीसरातला आहे, याची माहिती मिळू शकले नाही आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.