Weird Traditions Around The World: जगात अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथल्या परंपरा आपल्या देशाच्या तुलनेत खूप वेगळ्या आहेत. अशा अनेक प्रथा आहेत ज्या कोणाला माहीतही नाहीत. काही मान्यता अशा आहेत ज्यांच्याविषयी कोणाला काही माहित नसतं आणि आपण त्या मान्यता ऐकल्या तर नक्कीच आपल्याला आश्चर्य वाटेल. भारताबाहेरही अशा काही जमाती आहेत, ज्या आजही काही जुन्या परंपरांचे पालन करतात. सामान्य लोकांना या चालीरीती विटित्र वाटतील. पण या आदिवासींसाठी या परंपरा खूप खास आहेत. चला इंडोनेशियातील या जमातीबद्दल जाणून घेऊया.
इंडोनेशियातील एका जमातीमध्ये अशीच एक प्रथा प्रचलित आहे. हे ऐकूण तुम्हाला कसं तरी वाटेल. इंडोनेशियामध्ये, एका जमातीच्या स्त्रिया त्यांच्या प्रियजनांच्या मृत्यूनंतर त्यांची बोटे (Indonesian tribal) छाटतात.
जगभरात अशा अनेक परंपरा आहेत ज्या महिलांना अनेक विचित्र गोष्टी करण्यास भाग पाडतात आणि हे केवळ महिलांच्या बाबतीतच नाही तर पुरुषांनाही अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. इंडोनेशियातील डानी जमातीमध्ये प्रियजनांच्या मृत्यूनंतर महिलांची बोटे छाटण्याची प्रथा आहे. या समजुतीला इकिपालिन (Ikipalin) म्हणतात.
'द मिरर'च्या वृत्तानुसार, इंडोनेशियातील जयविजया (Jayawijaya) प्रांतातील वामिन शहरात डानी जमातीचे लोक मोठ्या प्रमाणात राहतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की या आदिवासी जमातीतील इकिपालिन या प्रथेवर इंडोनेशिया सरकारने अनेक वर्षांपूर्वी बंदी घातली होती. मात्र वयोवृद्ध महिलांची बोटे पाहता ते त्याचे पालन करतात हे सांगता येईल आणि आजही लोकांचा या परंपरेवर विश्वास असल्याचे दिसते.
आणखी वाचा : ... आणि अबू सालेम जाळ्यात फसला; DGP रुपिन शर्मांनीच सांगितला 'त्या' प्रसंगाचा थरार
दरम्यान, 2 बोटे दगडाच्या ब्लेडनं किंवा दोरीनं छाटली जातात. जमातीच्या लोकांचा असा विश्वास आहे की जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा कुटुंबातील स्त्री त्याच्या आत्म्याला शांती देण्यासाठी तिची बोटं छाटते. यासोबतच बोट छाटल्यानं हे देखील दिसून येतं की, व्यक्तीच्या मृत्यूचं दुःख बोटाच्या दुखण्यापेक्षा काहीच नसतं आणि ते आयुष्यभर त्यांच्यासोबत राहील.
एक दगडी ब्लेड सहसा बोटाचा वरचा भाग कापण्यासाठी वापरला जातो. काही प्रकरणांमध्ये, ब्लेडशिवाय बोट छाटलं जातं. लोक बोट चावतात आणि नंतर मध्ये दोरीनं घट्ट बांधतात, ज्यामुळे रक्ताभिसरण थांबते. दोरी बांधल्यानंतर जेव्हा रक्त आणि ऑक्सिजनची कमतरता असते तेव्हा बोट आपोआप गळून पडतं. छाटलेलं बोट एकतर पुरलं जातं किंवा जाळलं जातं.