Trending News - मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ऐकल्यावर तुम्ही पण थक्क व्हाल. दोन जावांनी एकत्र आत्महत्या केली आहे. तुम्हाला वाटेल की सासरच्या जाचाला कंटाळून त्यांनी आपलं आयुष्य संपवलं असेल. मात्र या आत्महत्यामागे वेगळीच कहाणी आहे.
या दोघी सख्या जावांचं गावातील एकाच तरुणावर प्रेम होतं. जेव्हा मोठ्या जाऊला कळलं की आपण दोघी एकाच तरुणावर प्रेम करत आहोत तिच्या पायाखालची जमीन सरकली. काही दिवसांनी त्या दोघींच्या नवऱ्यालाही त्यांच्या अनैतिक संबंधाबद्दल समजलं. (trending news story devrani and jethani elopes with young man and jumped in well in madhya pradesh in marathi)
यानंतर तिघांनी भीतीपोटी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. हे तिघेंही जंगलात जाऊन 3 दिवस लपून बसले. या तिघांनाही आपल्या भविष्याची काळजी वाटत होती, अशात तिघानीही एकत्र विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा कट रचला.
एका दिवशी त्या तिघांनी विहीत उडी मारली. मात्र घडलं वेगळंच काही. ज्या तरुणावर या दोघींनी प्रेम केलं त्यानेच त्यांना धोका दिला. विहिरीत उडी मारल्यावर त्या दोघी बुडाल्या मात्र तो तरुण पोहून बाहेर आला.
ऐकावं ते नवलंच, अशी ही प्रेम कहाणीने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली. छिंदवाडामधील लवाघोघरीच्या सोनपठारमधील ही धक्कादायक प्रेम कहाणी आहे.
30 वर्षीय सुशिलाना आणि 27 वर्षीय श्यावती यांचं मृतदेह मंगळवारी गावातील शेतात बांधलेल्या विहिरीत सापडले. पोलिसांना तपासादरम्यान गावात राहणाऱ्या स्वामी नावाच्या मुलासोबत या दोघींचे अनैतिक संबंध असल्याचे समजले. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.