अजब प्रकरण! एक मुलगा हिंदू, दुसरा मुलगा मुस्लीम... आईच्या अंत्यसंस्कारावरुन दोन भाऊ भिडले

महिलेच्या मृत्यूनंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार कोणत्या पद्धतीने करायचे यावरुन दोन भाऊ भिडले, अजब प्रकरणामुळे पोलीसही हैराण... 

Updated: Dec 7, 2022, 06:05 PM IST
अजब प्रकरण! एक मुलगा हिंदू, दुसरा मुलगा मुस्लीम... आईच्या अंत्यसंस्कारावरुन दोन भाऊ भिडले title=

Trending News : एका प्रकरणाची सध्या देशभर चर्चा आहे. एका महिलेच्या मृत्यूनंतर तिचं अंत्यसंस्कार (Funeral) कोणत्या पद्धतीने करायचं यावरुन दोन भावांमध्ये वाद झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं. वास्तविक या महिलेचा एक मुलगा मुस्लिम (Muslim) आहे तर एक मुलगा हिंदू (Hindu). त्यामुळे या महिलेचे अंत्यसंस्कार मुस्लीम पद्धतीने करायचे कि हिंदु पद्धतीने करायचे यावरुन चांगलाच वाद रंगला.

अंतिम संस्कारावरुन वाद
बिहारच्या लखीसराय इथली ही घटना आहे. रायका खातून या मुस्लीम महिलेने हिंदू पुरुषाशी लग्न केलं. लग्नानंतर तीचं नाव रेखा देवी असं बदलण्यात आलं. आपल्या पतीबरोबर ती लखीसरायमधल्या जानकीडीह गावात गेल्या 40-45 वर्षांपासून रहात होती. तीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या दोन मुलांमध्ये वाद सुरु झाला. मुस्लिम मुलाच्या म्हणण्यानुसार महिलेचा मृतदेह दफन केला जावा, तर हिंदु मुलाच्या म्हणण्यानुसार मुखाग्नी दिला जावा. वाद वाढत गेल्याने अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. 

हे ही वाचा : Shraddha Murder Case: श्रद्धा हत्या प्रकरणाचं हॉलीवूड कनेक्शन, आतापर्यंतचा मोठा खुलासा

काय आहे नेमकी घटना?
जानकीडीह गावात रहाणारे राजेंद्र झा यांनी रायका खातून हिच्याशी प्रेमविवाह केला. रायका खातून हिचं पहिलं लग्न झालं होतं आणि तिला एक मुलगा होता, त्याचं नाव मोहम्मद मोफित असं आहे. राजेंद्र झा यांच्याशी लग्न झाल्यानंतर रायका खातूनचं नवा रेखा देवी ठेवण्यात आलं. राजेंद्र आणि रेखा यांना दोन मुलं झाली. रेखा देवी यांचं वृद्धपकाळाने निधन झालं. 

हे ही वाचा : Green Tea पिताय ? सावधान ! ग्रीन टी आरोग्यासाठी धोकादायक, अहवालात धक्कादायक माहिती

पोलिसांनी काढला तोडगा
रेखा देवी या जन्माने मुस्लिम असल्या तरी लग्नानंतर त्यांनी धर्म बदलला होता. आपल्या पती आणि मुलांबरोबर ती 40 वर्ष रहात होती. ज्या गावात हे कुटुंब रहात होतं, तिथे रेखा देवी या पंडिताईन या नावाने ओळखल्या जात होत्या. रेखा देवी या हिंदु धर्मातील सर्व प्रथा आणि परंपराचं पालन करत होत्या. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही मुलांशी चर्चा करुन तोडगा काढला. सर्व माहिती घेतल्यानंतर पोलिसानी महिलेचा मृतदेह हिंदु मुलगा बबलू यांच्याकडे सोपवला. त्यानंतर त्या महिलेवर हिंदु पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.