Trending News In Marathi: एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना अचानत महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. महिला एकटीनेच निजामुद्दीनहून बांदा येथेल प्रवास करत होती. मात्र अचानत तिला प्रसव वेदना सुरू झाल्या. तेव्हा एक्स्प्रेसमध्ये असलेल्या प्रवाशांनीच मदतीला धाव घेत तिची प्रसूती केली. मुलीने गोंडस मुलीला जन्म दिला. एसी कोचमध्येच महिलेची प्रसूती झाल्यामुळं तिने त्याच एक्सप्रेस ट्रेनच्या नावाने मुलीचे नाव ठेवले.
उत्तर प्रदेश जिल्ह्यातील हरमपालपुर स्थानकातून हजरत निजामुद्दीन हून मानिकपूर येथे जाणाऱ्या एक्स्प्रेसमधून महिला प्रवास करत होती. मनी वर्मा असं या महिलेचे नाव असून ती २३ वर्षांची आहे. दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकातून उत्तर प्रदेश येथे असणाऱ्या बांदा येथील तिच्या घरी ती जात होती. मात्र, ट्रेन मऊरामीपूर स्थानकातून सुटल्यानंतर तिला प्रसव वेदना सुरू झाल्या. महिलेला त्रास सुरू होताच महिला प्रवाशांनी लगेचच तिच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. तर काही प्रवाशांनी महिलेची अवस्था पाहून टीटीईला या घटनेबाबत माहिती दिली. त्याचबरोबर महोबा जीआरपी ठाण्यातही याबाबत सूचना दिली होती.
ट्रेन हरपालपुर स्थानकात पोहोचल्यानंतर तिथे आधीपासूनच 108 रुग्णवाहिका बोलवण्यात आली होती. त्याचबरोबर प्राथमिक स्वास्थ केंद्रातील एएनएमद्वारे ट्रेनच्या बोगीतच महिलेची डिलिव्हरी करण्यात आली. महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला. प्रसूती झाल्यानंतर 10 मिनिटाहून अधिक वेळ ट्रेन स्थानकातच उभी होती. महिलेला रुग्णवाहिकेच्या मदतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर आई आणि नवजात बाळ दोघेही सुखरुप असल्याचे सांगितले. महिलेच्या कुटुंबीयांशी संपर्क करुन त्यांनाही ही बातमी सांगण्यात आली.
ज्या ट्रेनमध्ये मुलीचा जन्म झाला तेच नाव मुलीला ठेवण्यात आले आहे. नवजात मुलीच्या आईनेच असा निर्णय घेतला आहे. यूपी संपर्क क्रांती ट्रेनमध्ये महिलेची प्रसूती करण्यात आली. त्यावरुन तिने मुलीचे नावदेखील ठेवले आहे. महिलेने तिच्या मुलीचे नाव संपर्क क्रांती असं ठेवले आहे. महिलेने म्हटलं आहे की, ट्रेनमध्ये सुखरुप मुलीचा जन्म झाला आहे त्यामुळं त्या ट्रेनच्या नावावरुन मी माझ्या मुलीचे नाव ठेवले आहे.