मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत मोठी चूक, भाषण देत असताना पायाखाली आला साप

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषेदत साप घुसला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या घरातही सापाचं दर्शन झालं होतं. आता चक्क मुख्यमंत्री भाषण देत असताना त्यांच्या पायाखाली साप दिसला आणि एकच पळापळ झाली. 

राजीव कासले | Updated: Aug 21, 2023, 02:54 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत मोठी चूक, भाषण देत असताना पायाखाली आला साप title=

Bhupesh Baghel Snake Incident: छत्तीसगडचे (Chhattisgarh) मुख्यमंत्री भूपेश बघेल  (Bhupesh Baghel) यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल बिलासपूरमध्ये पत्रकरांना माहिती देत असताना अचानक साप (Snake) त्यांच्या पायापर्यंत आला. यावेळी त्यांच्याभोवती पत्रकारांचा गराडा होता, तसंच त्यांचे सुरक्षा रक्षकही होते. सापाला पाहाताच तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. यावर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना पत्रकारांनी विचारलं असता त्यांचं उत्तर हैराण करणारं होतं. 

पत्रकारांशी बोलत असताना मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या चक्क पायापर्यंत साप आला. यावर भूपेश बघेल यांनी दिलेलं उत्तर ऐकूण सर्वच आश्चर्यचकित झाले. सापाला घाबरण्याचं कारण नाही, मी लहानपणापासून खिशात साप घेऊन फिरतो, असं मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले. इतकंच नाही तर सापाला मारू नका असा सल्लाही त्यांनी दिला. सापाला सुरक्षित जाऊ देण्याचे आदेश त्यांनी सुरक्षा रक्षकांना दिले.

राहुल गांधी यांच्यावर प्रतिक्रिया
सप्टेंबर महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी छत्तीसगड दौऱ्यावर येणार आहेत. याची तयारी सुरु असल्याचं मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितलं. राहुल गांधी यांच्या दौऱ्यात कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा आयोजित केला जाणार आहे. यात लाखो कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

निवडणुकीची तयारी सुरु
छत्तीसगडमध्ये यावर्षीच विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री भूपेश बघेल जोरदार तयारीला लागले आहेत. सामान्य नागरिकांच्या भेटीगाठी, कार्यकर्त्यांचे मेळावे यावर ते जोर देत आहेत. छत्तीसगडमध्ये सलग तीनवेळच्या भाजप सरकारला धक्का देत 2018 मध्ये काँग्रेस सत्तेत आलं. पक्षाने भूपेश बघेल यांना मुख्यमंत्रीपद दिलं. 

भाजपने केली तयारी सुरु
काँग्रेसला हटवून पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपनेही तयारी सुरु केली आहे. निवडणुकीची घोषणा झालेली नसतानाही भाजपने 21 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या पाटण विधानसभा मतदारसंघातही भाजपाने उमेदवार दिला आहे. भूपेश बघेल यांच्या विरोधात भाजपने त्यांचेच पुतणे विजय बघेल यांना उमेदवारी दिलेली आहे. भूपेश बघेल यांच्या विरोधात भाजपने त्यांचेच पुतणे विजय बघेल यांना उमेदवारी दिलेली आहे. 2008 च्या विधानसभा निवडणुकीत विजय बघेल यांनी भूपेश बघेल यांचा पराभव केला होता. 

भाजपने ज्या 21 मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. त्या सर्व जागेवर भाजपाचा गेल्या निवडणुकीत पराभव झाला होता. .यावेळी भाजपने पराभूत उमेदावरांना तिकिट न देता जिल्हा पातळीवरचे नेते आणि जिल्हा परिषदेच्या सदस्याना संधी दिली आहे.