Trenidng Video : सोशल मीडियावर (Social Media) दररोज कोणते ना कोणते व्हिडिओ (Video) किंवा फोटो व्हायरल होत असतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून या फोटोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. CloudSEK चे CEO ने राहुल सासी यांनी सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे. बंगळुरुमध्ये (Bangaluru) राहणाऱ्या राहुल सासी (Rahul Sasi) हे कामानिमित्त बाहेर बाहेर पडले होते, यासाठी त्यांनी उबेर कार बुक केली. ठरलेल्या वेळेत उबेर कार त्यांच्याकडे आली. पण जेव्हा राहुल सासी यांनी उबेर (Uber) चालकाला पाहिलं तेव्हा ते थक्क झाले.
राहुल सासी यांनी सांगितला तो किस्सा
राहुल सासी यांनी बुक केलेली उबेर कार त्यांच्यापर्यंत पोहोचली. या कारचं सारथ्य एक महिला करत होती. पण थक्क करणारी गोष्ट अशी होती की या महिला कार चालकाच्या कुशीत तिची चिमुकली होती. ती चिमुकली आपल्या आईच्या कुशीत शांत झोपली होती. हे दृष्य पाहून राहुल सासी थक्क झाले, त्यांनी या महिला उबेर चालकाबरोबर फोटो काढला आणि तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
महिला उबेर चालकाची कहाणी
राहुल सासी यांनी या फोटोबरोबर त्या महिला उबेर चालकाबद्दल माहितीही शेअर केली आहे. या महिला चालकाचं नवा नंदिनी असं आहे. ती दिवसातील 12 तास उबेर कार चालवते. तिला आपल्या कामाबद्दल कोणताच आक्षेप किंवा लाज वाटत नाही. आपल्या कुटुंबाचं पालन-पोषण करण्यासाठी ती कठोर मेहनत करत आहे. उबेर कार चालवण्याआधी नंदिनी यांनी आपल्या बचत केलेल्या पैशांतून एक फूड ट्रक सुरु केला होता. पण कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला आणि तिला मोठा आर्थिक फटका बसला.
कोरोनाची दोन वर्ष नंदिनीसाठी खूप खडतर होती. फूड ट्रक बंद पडला होता, हाताला काम नव्हतं त्यामुळे तिला आणि तिच्या कुटुंबाला दोन घास मिळवण्यासाठीही कष्ट करावे लागत होते. पण नंदिनीने हार मानली नाही. कोरोना प्रादुर्भाव हळूहळू कमी झाल्यावर नंदिनी पुन्हा घराबाहेर पडली आणि तीने उबेर कार चालवण्याचा निर्णय घेतला.
कार चालवण्याबरोबर मुलीलाही सांभाळते
नंदिनी दिवसातले 12 तास उबेर कार चालवते. यातून मिळालेल्या पैशातून तिला पुन्हा आपलं फूड ट्रकचं साकार करायचं आहे. नंदिनीची एक मुलगी असून तिला सांभाळण्यासाठी कोण नसल्याने नंदिनी आपल्या मुलीला घेऊन कार चालवते. ट्रीप संपल्यानंतर राहुल सासी यांनी नंदिनीला सेल्फीबद्दल विचारलं, तेव्हा नंदिनीने अगदी हसत हसत सेल्फी काढली. हाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.