आता पंजाबमध्ये रेल्वे अपघात, चालकाचा जागेवरच मृत्यू

 देशभरात रेल्वे अपघातांच्या घटना घडत असताना या वेळी पंजाबमध्ये रेल्वे अपघात समोर आला आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 8, 2017, 09:20 PM IST
आता पंजाबमध्ये रेल्वे अपघात, चालकाचा जागेवरच मृत्यू  title=

पंजाब : रेल्वे प्रशासनातर्फे सर्व प्रकारचे प्रयत्न करुनही रेल्वे अपघात अद्यापही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. देशभरात रेल्वे अपघातांच्या घटना घडत असताना या वेळी पंजाबमध्ये रेल्वे अपघात समोर आला आहे. या अपघातात रेल्वे गाडीच्या चालकाचा (लोको पायलट) जागीच मृत्यू झाला. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार रविवारी फजिल्कायेथे मानवरहित फाटकावर एक सिमेंट कॉंक्रीट वाहणारा ट्र्क आणि रेल्वेची टक्कर झाली.
यामध्ये लोको पायलटचा मृत्यू झाला. 
राज्य रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डीएमयू रेल्वे सकाळी फिरोजपूरहून फाजिलकाकडे जायला निघाली होती. त्याचवेळी लधुका गावाजवळील ट्रकने रेल्वेला धडक दिली. ही टक्कर इतकी भयावह होती की मिक्सर ट्रक ट्रेन मध्ये अडकला आणि यामध्ये लोको पायलट विकास केपी ठार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.  यानंतर मिक्सर ट्रकच्या चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक चालक फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ट्रक ट्रेनच्या इंजिनला जाऊन चिकटला यावरु या अपघाताचा अंदाज घेता येऊ शकतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.